महाराष्ट्र
36211
10
भरधाव कारने चिरडल्याने माय-लेकाचा दुर्देवी मृत्यू
By Admin
भरधाव कारने चिरडल्याने माय-लेकाचा दुर्देवी मृत्यू
भरधाव कारने घराच्या ओट्यावर बसलेल्या
अपघातानंतर दोघे तरुण पसार : पारनेर शहरातील घटना
पारनेरकरांमध्ये हळहळ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शितल व स्वराज यांच्या दुर्देवी मृत्यूमुळे पारनेर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भरधाव वेगाने कार चालविण्याइतपत रस्ता नसतानाही, अरूंद रस्त्यावरून बेजबाबदारपणे वाहन चालवून माय लेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ताब्यात देण्यात आले.
कारचालक पसार
अपघातानंतर कारमधील दोघांनी जखमी स्वराज यास पारनेरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले व तिथून ते पसार झाले. त्यांनी पारनेर शहरात लावलेली अपघातग्रस्त कार गुरूवारी रात्री पारनेर पोलीसांनी ताब्यात घेतली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
कष्टाळू जोडपे
अजय येणारे व शितल येणारे
हे दोघेही अतिशय कष्टाळू होते. अजयच्या मत्स व्यवसायात शितल त्यास मदत करीत असे. सतत कार्यमग्न असलेल्या या जोडप्याच्या संसाराल दृष्ट लागल्याच्या प्रतिक्रिया महिलांमधून येत होत्या.
नातलगांचा आक्रोष
शितल व स्वराज या दोघांचाही मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्यांचे नातलग घटनास्थळी जमा झाले. दोघांच्या दुर्देवी व अकाली मृत्यूमुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या नातलगांचा तिथे हदय पिळवटून टाकणारा आक्रोष सुरू होता.
होती. चिरडल्यानंतर शितल यांच्या मांडीवर बसलेला स्वराज बाजूला फेकला गेला तर शितल यांना कारने काही अंतर फरफटत नेले. अपघाताची माहिती समजल्यानंतर परिसरातील तरूणांनी घटनास्थळी धाव घेत कार उचलून शितल यांना बाजूला काढले. दोघांनाही पारनेरच्या खाजगी रूग्णालयात नेण्यात आले असता त्यांना नगर येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र नगर येथे पोहचण्यापूर्वीच शितल यांचा
वाटेतच मृत्यू झाला. स्वराज यास नगरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यास विळद घाटातील विखे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. स्वराज यास विखे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर उपचार सुरू असतानाच मध्यरात्री बाराच्या सुमारास त्याचाही मृत्यू झाला. शितल व स्वराज यांचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या माय लेकाला चिरडून झालेल्या अपघातात दोघांचाही दुर्देवी मृत्यू झाला. गुरूवारी (दि.२३) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पारनेर शहरातील कुंभार गल्लीत ही दुर्देवी घटना घडली. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनूसार शितल अजय येणारे (वय २७, रा. कुंभारगल्ली, पारनेर) या त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा स्वराज अजय येणारे यास घेऊन घराच्या ओट्यावर बसल्या होत्या. सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास फोक्सवेगन पोलो कार दाभाडे वाडयाकडून लाल चौकाच्या दिशेने भरधाव वेगाने येत होती. शितल येणारे यांच्या घराजवळ आल्यानंतर कारने येणारे यांच्या घराबाहेर असलेल्या ५०० लिटर पाण्याच्या टाकीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर कारने दारात बसलेल्या शितल व स्वराज यांना चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की शितल यांच्या छातीचा भाग पुर्णपणे दाबला गेला होता तर स्वराज याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली
Tags :
36211
10





