पाथर्डीतील उपोषणात सहभागी होणाऱ्या सर्व सहकार्याचे, संघटनाचे आणि पक्षाचे पाथर्डीत येवून मानले आभार
By Admin
पाथर्डीतील उपोषणात सहभागी होणाऱ्या सर्व सहकार्याचे, संघटनाचे आणि पक्षाचे पाथर्डीत येवून मानले आभार
आमदार होण्याच्या आधी माझं पाथर्डीशी नातं - आमदार निलेश लंके
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
माझा इतिहास पहा मी राजकारणासाठी काही करत नाही.माझ्याकडे संघर्षशील म्हणून पाहिले जाते.मी जिथे संकट आहे तिथे मी धावून जातो.कोविड मध्ये काम करत असताना मी मतदारसंघाचा विचार न करता सर्वांना समान उपचार पद्धती दिली.तिथे मी राजकारण केले नाही.मी राजकारण हे फक्त निवडणुकीपुरत करतो.लोक आज निवडणुकीचा अर्थ काढतात परंतु पाथर्डी तालुक्याशी माझं जुनं नात आहे.मी आमदार नसतानाही पाथर्डी तालुक्यात येत होतो.मग मला आमदार होण्याच्या आधी लोकसभेचे स्वप्नं पडले होते का?आमच्या सरकारच्या काळातही विधानसभेमध्ये अहमदनगर-पाथर्डी,अहमदनगर-मनमाड रस्ताच्या प्रलंबित कामाबद्दल मी लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून ती कामे लवकरात लवकर करण्याची मागणी केली होती.महामार्गाच्या कामासाठी केलेले उपोषण सोडल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू झाले की नाही हे पाहण्यासाठी तसेच त्यांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र मोहटादेवीचे दर्शनासाठी पाथर्डी आले असता पत्रकार परिषदेत निलेश लंके बोलत होते.शनिवारी सायंकाळी आमदार निलेश लंके यांचे पाथर्डी तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले.त्यांचा यावेळी शहरातील नवीपेठ येथील गणपती मंदिर येथे सराफ संघटनेच्या वतीने
सन्मान करण्यात आला.
चार दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील रखडलेल्या महामार्गाच्या कामासाठी आमदार निलेश लंके जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण करण्यात आले होते.शनिवारी सकाळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निलेश लंके यांच्या उपोषण स्थळी भेट देऊन मध्यस्थी करत जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले,नॅशनल हायवे अथोरिटी चे चीफ इंजिनिअर शेलार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते यांच्या सोबत चर्चा करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क केल्यानंतर लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना लंके यांनी म्हटले की,अहमदनगर- पाथर्डी रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला होता.पाथर्डी ही पुण्यभूमी असून या ठिकाणी अनेक महत्त्वाचे धार्मिक स्थळे आहेत.पाथर्डीतील मोहटादेवी हे माझं श्रद्धास्थान असल्याने पाथर्डी आणि माझं जिव्हाळ्याच नातं आहे.दरवर्षी मी माझ्या तालुक्यातील भक्तांना नवरात्र काळात मोहटादेवीच्या दर्शनाला घेऊन येतो.या रस्त्याने प्रवास करताना आपण रोडसाठी का काही करू शकत नाही याची खंत होती.मी आमदार झाल्यानंतर पारनेरचा विकास करत असताना पाथर्डीतील रखडलेल्या
महामार्गासाठी काही तरी करेल असे नेहमी वाटायच.या महामार्गासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी,विविध पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीने १०० च्या वर आंदोलने केली.त्यानंतर पाथर्डी व शेवगाव येथील सर्व सहकाऱ्यांसोबत काही दिवसांपूर्वी ठोस पावले उचलण्यासंबंधी बैठक झाल्यानंतर उपोषणाचा निर्णय घेण्यात आला.
उपोषणाला बसल्यानंतर आमच्याकडे दुर्लक्ष करत उपोषण चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला.दुसऱ्या दिवसांपर्यंत आरोग्य विभागाकडून आमची साधी तपासणी ही करण्यात आली नाही.काही सहकाऱ्यांची तब्येत घालवत असताना देखील त्यांनी प्राण गेला तरी चालेल पण हा प्रश्न निकाली लागला पाहिजे ही भूमिका घेतली होती.त्यानंतर पत्रकारांनी आवाज उठवल्यानंतर आरोग्य विभागाचे डॉक्टर तिथे आले.ही आमची जीवन मरणाची लढाई होती.आम्ही चालू केलेलं उपोषण पाहिलं आणि शेवटचं ही आमची भूमिका स्पष्ट होती.
काही लोकांना काम करायचे नसते ते बोलघेवडे असतात.त्यांचा आरोप करणे फक्त एवढच काम असत.सगळ्या लोकांनी हात टेकले म्हणून आज निलेश लंकेने या प्रश्नासाठी पुढाकार घेतला.जे बोलतात त्यांचे कर्तव्य काय?काम महत्वाच मी पदाला सत्तेला शून्य किंमत देणारा माणूस आहे.मी माझ्या गोरगरीब जनतेला किंमत देतो.हे पद सत्ता आज येतील उद्या जातील.सत्तेसाठी काम करायचे नाही. माणसावर निस्वार्थी प्रेम करायचं त्यावेळेस जनता आपल्यावर प्रेम करते.
मी काम करणारा माणूस असून यांच्याकडे त्याच्याकडे बोट दाखवण्यातला मी नाही.मला या कामाचे कोणावर खापर फोडायचे नाही.आणि कोणाबद्दल काही चुकीचंही बोलायचे नाही.सगळ्यात महत्त्वाचे हे आहे माझी जी महत्वकांक्षा आणि ध्येय होत.ते पूर्ण झाले आहे मला कोणावर आरोप करून काय करायचे आहे.बेरोजगारी आणि गरिबी काय असते हे मला माहिती आहे.मी ही सामान्य कुटूंबात पुढे आलो आहे.
तसेच या सर्व रस्त्याच्या कामासंबंधी मी आणि विरोधी पक्षनेते जबाबदार असून प्रत्येक आठवड्याला कामाचा अहवाल घेत काम प्रगतीपथावर दिसेल.आम्ही जी काम सुरु झाल्याशिवाय उठणार नाही भूमिका घेतली होती.त्यानुसार काम सुरू झाले की नाही तसेच श्री क्षेत्र मोहटादेवीचे दर्शन घेण्यासाठी मी पाथर्डीत आलो.पाथर्डीकारांनी खऱ्या अर्थाने माझा जो आदर सन्मान केला मी त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही.आता अनेक जण पत्र दिल परंतु त्याप्रमाणे काम होईल की नाही हा तर्कवितर्क काढतात.पण या कामाचा शेवट होणार असून या कामाची जबाबदारी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार,केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी घेतली.पाथर्डीतील सर्व,सहकार्याचे संघटनाचे आणि पक्षाचे आभार ते माझ्या उपोषणात सहभागी झाले.तसेच
पाथर्डी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील निवासस्थानी जावून उपोषणानंतर प्रथम जेवण केले.यावेळी त्याच्यासोबत मिञ तसेच पदाधिकारी,ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.