कोरडगाव जिल्हा परिषद शाळेत मोफत वृक्ष रोपांचे वाटप
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा, वृक्षारोपण तसेच मोफत वृक्ष वाटपाचा कार्यक्रम कोरडगावच्या सरपंच सौ.साखरबाई नामदेव मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते, वंचितचे तालुकाध्यक्ष रविंद्र (भोरु शेठ) मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी विनायक गुरुजी देशमुख, ग्रामपंचायत सदस्य अरुण मुखेकर, त्रिंबक दादा देशमुख, नागनाथ वाळके, अनिल ससाने, स्वराज बोंद्रे, काकासाहेब देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली देशमुख, उपाध्यक्ष युसुफ शेख, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. खोजे, श्री भताने, सौ.पांढरे, सौ.पाखरे, सौ.गंभीरे,नानासाहेब जाधव, रमेश मोरे, योगेश मोरे,कयुम बागवान, नवनाथ कसबे, बाळासाहेब मुखेकर यांच्यासह कोरडगाव येथील ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला एक मोफत झाड देण्यात आले व शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष लागवड करणे व त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, कोरडगाव जिल्हा परिषद शाळेबरोबरच मुखेकर वाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वृक्ष वाटप करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करू तसेच निसर्गाचं संवर्धन करू. विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी एक झाड लावून त्याच संवर्धन करावं व निसर्गाचा समतोल राखण्यात मदत करावी, असे आवाहन श्री रवींद्र मस्के यांनी विद्यार्थ्यांना केले. जिल्हा परिषद शाळेच्या वतीने शाळा पूर्व तयारी मेळावा घेण्यात आला.