महाराष्ट्र
4065
10
इंग्रजी विषयाची कॉपी न दिल्याने एजंटला मारहाण केल्याची चर्चा,
By Admin
पाथर्डी- इंग्रजी विषयाची कॉपी न दिल्याने एजंटला मारहाण केल्याची चर्चा, 12 वीच्या परीक्षा केंद्रावरील घटना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्र बोर्डच्या १२वी च्या इंग्रजी भाषेच्या पेपरला शहरातील एम एम निऱ्हाळी विद्यालयाच्या परिक्षा केंद्राबाहेर पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी आमच्याकडून पैसे घेऊन आम्हाला कॉपी पुरवली नाही.या कारणावरून एका एजंटला घेराव घालत मोठा गोंधळ घातला.त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी येत संबंधित एजंटला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले त्यानंतर पोलिस ठाण्यात दोन तास चाललेल्या गोंधळानंतर संबंधित एजंटच्या बॉसने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पुढील पेपरला कुठलीही अडचण येणार नाही अशी फोनवर हमी दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कुठलीही तक्रार दाखल न करता परतीची वाट धरली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मंगळवारी १२ वी बोर्डाच्या च्या पेपरला सुरुवात झाली आहे.तालुक्यातील अनेक केंद्र हे संवेदनशील असल्याने तेथे कॉपीचा कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी विद्यालयाने घेतली होती.प्रशासनाच्या या भूमिकेने मात्र तालुक्याबाहेरील प्रवेश असणाऱ्या विद्यार्थ्यांची फजिती झाली.इंग्रजीचा पेपर संपल्यानंतर आम्ही एवढे हजारांनी पैसे दिले,तुम्ही पास करण्याची हमी दिली होती,आम्हाला कुठलीही मदत झाली नाही,आम्ही पास कसे होणार,आमचे पैसे परत करा असे म्हणत एजंटला घेराव घातला.त्यानंतर सदरील घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी येत संबंधित एजंटला पोलीस ठाण्याला घेऊन गेले असता बाहेरील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी मोर्चा पोलीस ठाण्याकडे वळवला.
विद्यार्थी आणि पालक हे पोलीस ठाण्याला आल्यानंतर आम्ही मुंबई,औरंगाबाद,सातारा, पुणे,बीड या ठिकाणाहून आलो खर्च करून आलो आहोत.तसेच संबंधित एजंटने आमच्याकडून हजारांनी पैसे घेत आमच्या मुलाना पास करण्याची हमी दिली आहे.परंतु आजच्या पेपरला मुलांना कुठल्याही प्रकारची मदत केली नाही.आमच्या मुलांना कुठलीही कॉपी करू दिली नाही.तालुक्यातील मुले खुशाल कॉपी करत होते.आमच्या मुलांना वेगळा न्याय आणि तालुक्यातील मुलांना वेगळा न्याय का?असे आरोप यावेळी त्यांनी केले.
त्यानंतर संबंधित एजंटचा बॉसचा त्यातील एका पालकाला फोन आल्यानंतर त्याने मी विद्यार्थ्याच्या हिताचे काम करत आहे.झालं गेलं सोडून द्या तुमच्या मुलांची जबाबदारी माझी असे म्हणत येणाऱ्या पेपरला कुठलीही अडचण येणार नाही असा शब्द दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी उद्या पाहू असे म्हणत पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल न करता परतीची वाट धरली.
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील परीक्षाकेंद्रावर पैसे देऊनही इंग्रजी विषयाची कॉपी न दिल्याने एजंटला मारहाण झाल्याची चर्चा आहे.
ही मारहाण मुंबई-पुण्यासह राज्यातील इतर भागातील विद्यार्थ्यांकडून (Students) करण्यात आली आहे. भरभक्कम पैसे घेऊन पास करुन देण्याची हमी ग्रामीण भागातील काही संस्था देतात, त्यासाठी त्यांनी एजंट देखील नेमल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतचे वृत्त अनेक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले आहे.
पोलिसात तक्रार दाखल नाही
काल (21 फेब्रुवारी) बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर होता. या पहिल्या पेपरलाच पाथर्डी तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर कॉपी न पुरवल्यानं मुंबई-पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून माणिकदौंडी रस्त्यावर एजंटला मारहाण झाल्याची चर्चा आहे. याबाबत पोलिसात तक्रार झाली नसून, पुढील पेपरला आपल्याच पाल्यांना अडचण होईल म्हणून पालकांनी तक्रार दिली नसल्याचे समोर आले आहे. विद्यार्थी पोलि स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेल्याची माहिती देखील मिळत आहे. याबाबतचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यातील संभाषणावरुन हे स्पष्ट होते की, पालक संबंधित संस्था चालकांशी फोनवरुन कॉपीबाबत बोलत आहेत. मात्र, याची पुष्टी पोलिसांनी करणं गरजेचं आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळं विद्यार्थ्यांचे पालक देखील अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा
राज्यभरात कालपासून बारावी बोर्ड परीक्षेला (HSC Exam) सुरुवात झाली आहे. ही परीक्षा शंभर टक्के कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण मंडळाकडून अभियान राबवलं जात आहे. मात्र, पाथर्डीत कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. कॉपी पुरवल्यानं एजंटलाच विद्यार्थ्यांनी मारहाण केली आहे. हमखास पास होण्याची गॅरंटी असणाऱ्या या परीक्षा केंद्रावर मुंबई पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थी प्रवेश घेतात. हे विद्यार्थी तक्रार देण्यासाठी पोलिस स्थानकात गेले होते.
कसं आहे कॉपीमुक्त अभियान?
परीक्षा केंद्राच्या आतमध्ये जाण्याआधी शंभर टक्के विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची झाडाझडती घेतली जाणार आहे. त्यासाठी सुद्धा विशेष यंत्रणा परीक्षा केंद्रांवर सज्ज आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाय कुठल्या प्रकारचा गोंधळ निर्माण झाल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा परीक्षा केंद्रावर ठेवण्यात आला आहे. परीक्षा केंद्रापासून 100 मीटर अंतरावरील झेरॉक्स दुकाने सुद्धा बंद ठेवण्यात येणार आहेत.
Tags :

