महाराष्ट्र
24099
10
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ
By Admin
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे संदर्भाची फाईल मंत्रालयात.सन 2015 पासून धुळखात बंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सोनार,सुवर्णकार समाजाच्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घेण्याची गरज. महामंडळ स्थापन झाली तर खूप मोठा फायदा होईल-बालाजी सुवर्णकार.
शेवगाव प्रतिनिधी.
आज महाराष्ट्रामध्ये अनेक विविध जाती धर्मांचे समाज बांधव आहेत. अनेक समाज बांधवांचे आर्थिक विकास महामंडळे स्थापन झालेली आहेत. अल्पकालावधीतच ओबीसी संवर्गातील नाभिक समाजाचे आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाली आहे. ओबीसी संवर्गातील भूषणावह बाब म्हणावी लागेल. यात अजिबात ती मात्र शंका नाही. ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सन 2015 मध्ये श्री संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे रीतसर प्रस्ताव मंत्रालयात दाखल केलेला आहे. ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शेठ हिवरकर, दैवज्ञ सोनार महासंघाचे अध्यक्ष दिलीप महतकर यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी यांनी पाठपुरावा केलेला आहे. परंतु त्याची अद्याप कुठलीही कारवाही न झाल्यामुळे ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेली सन 2015 मधील फाईल मंत्रालयात धुळखात बंद पडलेली असून त्याकडे सातत्याने शासनाचे व संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सर्वत्र सोनार, सुवर्णकार समाजातील सर्व बांधवांना दिसत आहे.
सोनार, सुवर्णकार समाजातील अनेक मान्यवर , शैक्षणिक, सामाजिक,राजकीय, व्यापार, उद्योग, कला, साहित्य ,क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत. परंतु त्यांनीही या *श्री संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे संदर्भात कुठलाही पुढाकार घेतलेला नाही किंवा घेत असलेली दिसून येत नाही. श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या नावे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून शासनाने आर्थिक मंजुरी दिल्यास सोनार सुवर्णकार समाजातील सर्व महिला युवक युवती यांना विविध योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध घेऊन ते स्वावलंबी होण्याचे स्वप्न पहात आहेत. श्री संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे संदर्भातली 2015 पासून मंत्रालयात धूळ खात बंद पडलेल्या फाईलचा उलगडा करून आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच सोनार, सुवर्णकार समाज बांधवांनी शैक्षणिक सामाजिक राजकीय अधिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाज बांधवांनी सातत्याने याचा पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील समाज बांधवांनी, सोनार, सुवर्णकार समाजातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या पुढार्यांना सोबत माननीय उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यासाठी आता ऑल इंडिया सोनार फेडरेशन, दैवज्ञ सोनार महासंघ, दैवज्ञ सोनार कर्मचारी सेवा संघ, महाराष्ट्रातील सोनार सुवर्णकार समाजाच्या असलेल्या सामाजिक, शैक्षणिक संस्था, सेवानिवृत्त कर्मचारी, सामाजिक कार्याची आवड असणारे सर्वच समाज बांधव ,भगिनी, युवक, युवती राजकीय क्षेत्रातील सर्व पुढाऱ्यांनी एकत्र येऊन श्री संत शिरोमणी नरहरी महाराजआर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे संदर्भात आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत अखिल भारतीय सुवर्णकार समाजाचे लातूर जिल्हाध्यक्ष तथा ओबीसी बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष शिक्षक बालाजी सुवर्णकार यांनी दिलेल्या एका प्रसिद्धी पत्रकामध्ये आपले मत व्यक्त केले आहे.
सोनार, सुवर्णकार समाजातील सर्वांनीच आप आपसातील मतभेद विसरून सोनार ,सुवर्णकार समाजाच्या शैक्षणिक सामाजिक, आर्थिक विकास होण्यासाठी विकास महामंडळ स्थापन करणे संदर्भात आता महाराष्ट्रामध्ये खूप मोठी चळवळ उभी करणे ही काळाची गरज असल्याचेही मत बालाजी सुवर्णकार यांनी दिलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात आपले मत व्यक्त केले असून श्री संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले तर सर्वांनाच याचा खूप मोठा फायदा होणार आहे.
लवकरात लवकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणे संदर्भात सर्व सोनार , सुवर्णकार समाज बांधवांनी एकत्र येऊन आता आवाज उठवण्याची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील विविध सोनार, सुवर्णकार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीयदृष्ट्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय पुढारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे सर्व हित जपणारे, ओबीसी प्रवर्गातील समावेशक जातीतील जाती धर्मांना न्याय मिळवून देणारे , हित जाणणारे मा. नामदार एकनाथ राव शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई 32 यांच्याकडे प्रत्येक तालुक्यातील उपजिल्हाधिकारी, किंवा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदने द्यावेत, सातत्याने शासन दरबारी पत्रव्यवहार करण्याचे आवाहनही बालाजी सुवर्णकार यांनी केले आहे. सातत्याने प्रयत्न केल्यास यश नक्कीच येते जिद्द चिकाटी आणि उमेद इच्छाशक्तीची गरज आहे. केल्याने होत आहे रे! आधी केलेचि पाहिजे.!! कष्ट विना फळ नाही. जनसेवा हीच ईश्वर सेवा "बहुजन हिताय बहुजन सुखाय" हे ब्रीद वाक्य मनाशी धरून सर्वच, सोनार सुवर्णकार समाज बांधवांनी एकत्र येऊन आता लढा दिल्यास नक्कीच यश प्राप्त होते .असेही मत शिक्षक बालाजी सुवर्णकार यांनी व्यक्त केले आहे.
Tags :
24099
10





