महाराष्ट्र
ट्रक्टर-ट्रॉली चोरीतील टोळीच्या म्होरक्याला अटक, पाच गुन्ह्यांमधील 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By Admin
ट्रक्टर-ट्रॉली चोरीतील टोळीच्या म्होरक्याला अटक, पाच गुन्ह्यांमधील 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील ट्रक्टर-ट्रॉलीचोरीतील टोळीच्या म्होरक्याला शेवगाव पोलिसांनी गजाआड केले आहे. तसेच त्याच्या साथीदाराकडून पाच गुह्यांमधील ट्रक्टर ट्रॉलीसह 21 लाख 15 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या साथीदारांना तीन महिन्यांपूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. मात्र, मुख्य आरोपी फरार होता. भारत अशोक चितळकर (रा. गुंतेगाव, ता. गेवराई, जि. बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
शेवगाव तालुक्यातील आखेगाव, वाडगाव, सुकळी, हसनापूर, आव्हाणे येथून तीन ते चार महिन्यांपासून ट्रक्टर-ट्रॉली चोरीला जाण्याच्या घटना घडल्याने शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात योगेश बाबासाहेब गरड (रा. सुकळी), विक्रम धोंडिबा जवरे (रा. वाडगाव), विठ्ठल विक्रम ढाकणे (रा. हसनापूर), सुधाकर भिवसेन काटे (रा. आखेगाव) आदी शेतकऱयांचे ट्रक्टर व ट्रॉली चोरीला गेल्याच्या तक्रारी शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी याप्रकरणी नेमलेल्या पोलीस पथकाने या प्रकरणातील संशयित आरोपी गणेश काकासाहेब झिरपे (रा. कोळगाव, ता. शेवगाव) याला सापळा रचून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्याने साथीदार संजय रावसाहेब खर्चन (रा. आखेगाव), मुख्य आरोपी भारत अशोक चितळकर, सचिन गोर्डे, लाला गोर्डे (दोघे रा. गुंतेगाव, ता. गेवराई, जि. बीड) यांच्या मदतीने या चोऱया केल्याची कबुली दिली होती. मुख्य आरोपी भारत चितळकर हा गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर चितळकर याला शेवगाव पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पाच गुह्यांतील चोरीस गेलेले ट्रक्टर व ट्रॉली असा एकूण 21 लाख 15 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, रवींद्र बागुल, आशीष शेळके, गुप्तवार्ता विभागाचे बप्पासाहेब धाकतोडे, सुखदेव धोत्रे, राजू ढाकणे, संपत खेडकर, सचिन खेडकर, रामहरी खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल नाकाडे, मरकड, शेळके, टेकाळे, रवींद्र शेळके, सोमनाथ घुगे यांनी ही कारवाई केली आहे.
Tags :
487333
10