देशसेवा योगदान पुरस्कार माजी सैनिक विकास म्हस्के यांना जाहीर
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर सेवाधाम यांचेकडून दिला जाणारा देशसेवा योगदान पुरस्कार हा माजी सैनिक मेजर विकास म्हस्के यांना जाहीर करण्यात आला आहे.
श्री संत ज्ञानेश्वर सेवाधामचे मठाधिपती प्रेममूर्ती, गुरुवर्य ह. भ. प. श्री अनिल महाराज वाळके यांच्या ५० व्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त देण्यात येणारा देशसेवा योगदान पुरस्कार हा सरपंच भोरूशेठ म्हस्के यांचे बंधू तथा नवजीवन संगोपन केंद्र, आष्टीचे संस्थापक/ अध्यक्ष मेजर विकास म्हस्के यांना श्री संत ज्ञानेश्वर सेवाधाम येथे ह. भ. प. श्री महंत भास्करगिरीजी महाराज, श्रीक्षेत्र देवगड यांचे हस्ते मान्यवर संतांच्या उपस्थितीत दि.११ नोव्हेंबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
मेजर विकास म्हस्के यांनी देशसेवेसाठी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे दिवस देशासाठी अर्पण केले आहेत.सर्व सुखांचा त्याग करून आपले जीवन देशसेवेसाठी दिले.म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली, त्याबद्दल सरपंच भोरूशेठ म्हस्के मित्र मंडळाच्या वतीने तसेच सर्व स्तरातून मेजर विकास म्हस्के यांचे अभिनंदन केले जात आहे.