माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन भाऊ काकडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त. विविध समाजोपयोगी उपक्रमाने बालमटाकळी व बोधेगाव साजरा
शेवगाव-प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील उपसरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांचा वाढदिवस विविध समाजउपयोगी उपक्रम राबवून बालमटाकळी व बोधेगावात त्यांच्या चाहत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. यामध्ये बोधेगाव परिसरात तसेच श्री शिवाजी हायस्कूलमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. गोशाळेतील जनावरांना चारा देण्यात आला. तसेच बालमटाकळी या ठिकाणी देखील बळीराजा ग्रुपचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव जिजा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून नितीन काकडे यांचा वाढदिवस मोठे उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बोधगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर गावंडे, पोलीस नाईक सुखदेव धोत्रे, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप राठोड, केदारेश्वरचे माजी तज्ञ संचालक मयुर हुंडेकरी, युवा नेते संग्राम काकडे, ग्रामपंचायत सदस्य सदानंद गायकवाड, लाडजळगावचे उपसरपंच दत्तात्रय तहकीक, प्रकाश गर्जे सामाजिक कार्यकर्ते बन्सीभाऊ मिसाळ, भगवान मिसाळ, इसाक शेख, बबनभाई कुरेशी, बाबाभाई पठाण, राजू बागवान, आत्माराम घोरपडे, सुंदरनाना काशीद, विनोद मिसाळ, महादेव घोरतळे, सेवानिवृत्त मेजर परमेश्वर पाचपुते, बळीराजा ग्रुपचे अध्यक्ष सर्जेराव जिजा घोरपडे, बाळासाहेब घोरपडे, आबासाहेब घोरपडे, संभाजी घोरपडे, भारतराव घोरपडे, शिवाजी घोरपडे, भिमराव पाटेकर, विष्णू घाडगे, भाऊसाहेब खेळकर, गणेश गाडे, गणेश जगताप, तान्हाजी घोरपडे, भारत वाघुंबरे, रंगनाथ वैद्य, अर्जुन लोणकर, विठ्ठल पवार, शिवाजी बामदळे, माऊली बामदळे यांच्या सह ग्रामस्थ तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.