35 लाख शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीक विमा
By Admin
35 लाख शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीक विमा
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार जमा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यातील पीक विमा (crop insurance) कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 700 कोटी 73 लाख रुपये पीक विमा (Maharashtra crop insurance) अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे.
बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सांगितले.
विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या (Farmer) बॅंक खात्यांवर थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी (crop insurance Company) सुरुवात केली आहे. खरीप हंगामात विविध जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये राज्यातील 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे.
अंतरिम नुकसान भरपाई (MSA) अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीक विमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्यस्तरावर अपील केलेले होते. अपिलांच्या सुनावण्या होत गेल्या, त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यांनी एकूण 1700 कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे. तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये वाढ होणार आहे.
जिल्हा – लाभार्थी शेतकरी – पीकविमा रक्कम (रुपयांत)
नाशिक – 3 लाख 50 हजार – 155.74 कोटी
जळगाव – 16,921 – 4 कोटी 88 लाख
अहमदनगर – 2,31,831 – 160 कोटी 28 लाख
सोलापूर – 1,82,534 – 111 कोटी 41 लाख
सातारा – 40,406 – 6 कोटी 74 लाख
सांगली – 98,372 – 22 कोटी 4 लाख
बीड – 7,70,574 – 241 कोटी 21 लाख
बुलडाणा – 36,358 – 18 कोटी 39 लाख
धाराशिव – 4,98,720 – 218 कोटी 85 लाख
अकोला – 1,77,253 – 97 कोटी 29 लाख
कोल्हापूर – 228 – 13 लाख
जालना – 3,70,625 – 160 कोटी 48 लाख
परभणी – 4,41,970 – 206 कोटी 11 लाख
नागपूर – 63,422 – 52 कोटी 21 लाख
लातूर – 2,19,535 – 244 कोटी 87 लाख
अमरावती – 10,265 – 8 लाख
15394
10





