महाराष्ट्र
दादापाटील राजळे महाविद्यालयात भूगोल दिन साजरा
By Admin
दादापाटील राजळे महाविद्यालयात भूगोल दिन साजरा
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील दादा पाटील राजळे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने शनिवार (दि. 14) रोजी पृथ्वीगोलाचे पूजन करून भूगोल दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांनी आपले विचार व्यक्त केले . पृथ्वीवरील प्रदूषण कमी करायचे असेल तर सेंद्रिय घटकांचा जास्तीत जास्त वापर, घरातील कचऱ्याची विल्हेवाट करताना सेंद्रिय पदार्थांचा खत तयार करण्यासाठी उपयोग करावा. प्लॅस्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा. ग्लोबल वार्मिंग ,जल , मृदा, वन , प्राणी , पक्षी यांचे संवर्धन व संधारण करणे जरूरीचे आहे .जेणेकरून पुढील पिढ्यांना या नैसर्गिक स्त्रोतांचा उपयोग होईल . या दशकाचा विचार करता निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती व मानव निर्मित आपत्ती मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोविड-19 , दुष्काळ , महापूर , चक्रीवादळे , ढगफुटी , जमीन खचणे , (जोशी मठ) याविषयी आपले विचार प्रा .डॉ. जे .एन . नेहुल यांनी व्यक्त केले.
कालगणना, उत्क्रांती, संस्कृती , लोकसंख्या ,शेती तसेच पिके , प्राणी , पक्षी आणि जलचर यांच्या मृत्यूस कारणीभूत असणारे प्रदूषण इ. विषयाचाही ऊहापोह झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. जी.बी . लवांडे यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा.शामराव गरड यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. यावेळी प्रा. डॉ.राजू घोलप व प्रा.आर.एम.बावस्कर यांनी भूगोल दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले . या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. ए.के. भोर यांनी केले . सूत्रसंचालन प्रा . आर.सी . इंगळे यांनी केले. प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या . मा. कार्यालयीन अधिक्षक विक्रमराव राजळे प्रा. डॉ. एस . जे . देशमुख, प्रा. डॉ. जे . टी . कानडे , प्रा. डॉ. निर्मला काकडे, प्रा. डॉ.राजकुमार घुले , प्रा.डॉ.किशोर गायकवाड , प्रा.डॉ.संजय भराटे, प्रा. डॉ. बबन टिळेकर, प्रा.अशोकराव काळे प्रा. बाबासाहेब चोथे, प्रा. दिलीप चौधर , प्रा. मोहिनी कुटे , प्रा.अनिता पाटोळे प्रा.प्रकाश बांबेरे , प्रा. शरद मिसाळ तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Tags :
28381
10