महाराष्ट्र
8005
10
माणिकदौंडी परिसरातील तेरा विद्यार्थ्यांची पोलीस दलात भरती
By Admin
माणिकदौंडी परिसरातील तेरा विद्यार्थ्यांची पोलीस दलात भरती
महसूल मंडळाच्यावतीने सत्कार समारंभाचे आयोजन
पाथर्डी - प्रतिनिधी
माणिकदौंडी महसुल मंडळाच्या वतीने महसुल भवन माणिकदौंडी येथे माणिकदौंडी परीसरातील महाराष्ट्र पोलीस दलात आणि मुंबई अग्निशामक दलात भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या वेळी महसुल मंडळाच्या मंडलाधिकारी वैशाली दळवी, तलाठी राजु मेरड आणि पोलीस पाटील वसंत वाघमारे यांनी फेटा, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला.कार्यक्रमच्या अध्यक्षा मंडलाधिकारी वैशाली दळवी होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील वसंत वाघमारे यांनी करुन नवीन भरती झालेल्या तरुण तरुणींना शुभेच्छा दिल्या तसेच तलाठी राजु मेरड आणि शिव छत्रपती करीयर अकॅडमीचे तुकाराम मरकड यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
या वेळी माजी सैनिक मेजर रियाज पठाण ( मुंबई पोलीस ), राहुल चव्हाण ( मुंबई पोलीस ), तुषार डमाळे ( मुंबई पोलीस ), राहुल डमाळे ( मुंबई पोलीस ), सागर कांबळे (ठाणे शहर पोलीस ), नवनाथ पवार ( मीरा भाईंदर पोलीस ), तर मुलींमध्ये जयश्री डमाळे ( मुंबई अग्निशामक दल ), रुपाली सोनाळे ( मुंबई पोलीस ), वर्षा पाखरे ( मुंबई लोहमार्ग पोलीस ), उषा पाखरे ( मुंबई पोलीस ), संजीवनी नागरे ( मुंबई पोलीस ), सृष्टी गर्जे (ठाणे शहर पोलीस ), शारदा शेटे ( पिंपरी चिंचवड पोलीस ) या माणिकदौंडी तसेच परीसरातुन यश संपादन केलेल्या तरुण तरुणींनी सत्कारास उत्तर देतांना आपल्या केलेल्या संघर्षाच्या यशोगाथा सांगत असतांना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. उषा पाखरे ही आपल्या एका वर्षाच्या मुलाला आई वडीलांकडे सांभाळ करण्यास सोडून देऊन भरती प्रक्रीयेत उडी घेत, मैदानी आणि लेखी चाचणीचा अभ्यास करत होती. तर जयश्री डमाळे ही तरुणी आपल्या लहान बाळाला घरी ठेऊन जिद्द आणि चिकाटीने मैदानी सराव करत असल्याचे आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. शारदा शेटे आणि वर्षा पाखरे या दोन तरुणींनी आपल्या नवऱ्याच्या डोळ्यात पाहीलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी घरच्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आदर व्यक्त केला.
मंडलाधिकारी वैशाली दळवी यांचे संकल्पनेतुन या सत्कार समारंभासाठी तलाठी राजु मेरड, पोलीस पाटील वसंत वाघमारे यांचे सह लतीफ शेख यांनी मोलाचे परीश्रम घेतले. यावेळी उपस्थीत भरती झालेल्या सर्वांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडुन वाहत होता.
Tags :
8005
10





