जमिनीचा नकाशा काढून देण्यासाठी मागितली 4 लाखांची लाच; भूमीअभिलेख शिपायास 'एसीबी'कडून अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नाशिकमध्ये लाच मागीतल्याचे प्रकरण समोर आले आहे. जमिनीच्या हद्दी खुणा दाखवून नकाशा काढून देण्याच्या मोबदल्यात भूमी अभिलेखाने अधीक्षक आणि स्वतः साठी चार लाखांची लाच मागितली. त्यानंतर साडेतीन लाख रुपये स्वीकारताना भूमिअभिलेखच्या शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
नितेंद्र काशीनाथ गाढे (रा. निफाड) असे शिपायाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील फिर्यातदार यांच्या मावशीची निफाड तालुक्यातील दिक्षी या गावी शेतजमीन असून, ही शेतजमीन मोजणीसाठी त्यांनी भूमिअभिलेख कार्यालय निफाड येथे दिनांक 25 जानेवारीला अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदारांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर या जमिनीची भूमी अभिलेख कार्यालय यांच्यामार्फत दिनांक 28 फेब्रुवारीला मोजणी झाली होती. मात्र हद्दी खुणा दाखवाण्याचे काम अद्याप बाकी होते.
त्यानंतर दिनांक 07 मार्च 2025 रोजी हद्दी खुणा दाखवून व नकाशा काढून देण्याचे काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात स्वतः साठी व भावड यांच्या नावे 4 लाख रुपये लाचेची मागणी केली. मात्र तडजोडी अंती साडेतीन लाख एवढी रक्कम लाच म्हणून द्यायची ठरली. त्यानंतर तक्रारीनुसार एसीबी सापळा रचण्यात आला. लाचेची रक्कम स्वीकारताना शिपाई गाढे याला रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलीस निरीक्षक मीरा कौतिका वसंतराव आदमाने, पोलीस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.