महाराष्ट्र
पाथर्डीत साऊंड असोशिएन संघटनेची नियमावली जाहीर
By Admin
पाथर्डीत साऊंड असोशिएन संघटनेची नियमावली जाहीर
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील साऊंड,बॕन्ड असोशिएन संघटनेची बैठक संपन्न झाली.यावेळी सदस्य निवड सर्वानुमते तसेच
नियमावली तयार करण्यात आली आहे.
कुठल्याही प्रकारचे दोन साऊंड मध्ये कॉम्पीटीशन होणार नाही. जर कुठल्याही दोन साऊंड मध्ये कॉम्पीटीशन केलेले आढळयास व त्याचा व्हिडीओ मिळाल्यास २०,०००/- रुपये दंड आकारण्यात येईल.
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव,चितळी,पाडळी,हञाळ,माळी बाभूळगाव,तीसगाव,खरवंडी कासार,खेर्डै,पागोरी पिंपळगाव,माणिकदौडी तसेच तालुक्यातील सर्व गावात बाजारपेठ परीसर येथे सार्वजनिक कामासाठी एक प्लाझ्मा एक टॉप मिरवणूकीसाठी परवानगी राहील. नियमाच्या बाहेर म्हणजे (५ फुटी) टॉपच्या वर लावू नये.
सार्वजनिक मिरवणूकीसाठी दोन बेस व दोन टॉप (चार फुटी टॉपला) किंवा एक प्लाझ्मा एक टॉप ५ फुटी याला लावावा लागेल.
प्लाझ्मा मध्ये कुठल्याही प्रकारचा हाईस नसावा. आढळयास २०,०००/- दंड आकारण्यात येईल. लग्नासाठी सार्थक मंगल कार्यालय,माने मंगल कार्यालय,यशतारा मंगल कार्यालाय,आशिर्वाद, सिद्धी विनायक समर्थ लॉन व गोरे मंगल कार्यालय, राजळे लॉन वा ठिकाणी कमाणीच्या आतमध्ये साऊंड वाजवू नये.तसेच
तालुक्यातील सर्व मंगल कार्यालय येथे हळदीच्या व तसेच बर्थडे या कार्यक्रमात
साऊंड हा रात्री १०.०० वाजता बंद करण्यात यावा. त्यांनतर वाजवल्यास काही अडचण आली तर असोशिएन जबाबदार राहणार नाही. सार्वजनिक कार्यक्रमात तसेच इतर कार्यक्रमास एक प्लाझ्मा एक टॉप लावावा.
समर्थ लॉन या कार्यालयात कुणीही हळदीचे काम घेऊ नये काम घेतल्यास असोशिएन पोलिस स्टेशनला माहिती देईल. व जबाबदार स्वताः हा साऊंड मालक राहणार आहे.अशी नियमावली तयार केली आहे.
पाथर्डी तालुका साऊंड असोशिएन संघटना पदाधिकारी व सदस्य
मिलिद काळे,आकाश बोरूडे,आकाश लवांडे
मल्हारी मांगरे,संदीप ढवळे,नयुम शेख,सौरभ काकडे,आदीनाथ काकडे, नितिन पानखडे,एकनाथ दहिफळे,वैभव पालवे
सत्यम वाल्हेकर,निखिल काकडे,बंटी बडे
अविज शेख,योगेश पायमोडे,आण्णा मोहीते
गणेश शेकडे,ब्रम्हदेव शिरसाठ,आशिश कंठाळे,पांडुरंग कंठाळे,चैतन्य मिसाळ
संदीप घूले,सोमनाथ कारखिले,सुरज डमाळे
संकेत शेळके, अमोल शिरसाट,गौरव एडके,मनोज वाघ,बाबा पायमोडे यावेळी उपस्थित होते.
Tags :
89372
10