महाराष्ट्र
ऊस दर प्रश्नी 'स्वाभिमानी' उतरणार रस्त्यावर
By Admin
ऊस दर प्रश्नी 'स्वाभिमानी' उतरणार रस्त्यावर
सोमवारी करणार रास्ता रोको समन्वय बैठकीबाबत तहसीलवर गलथानपणाचा आरोप
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव :
गळीत हंगाम सुरु झाला
आहे, मात्र साखर कारखान्यांकडून अद्याप चालू हंगामातील उसाचे दर जाहीर झालेले नाहीत. दराबाबत प्रशासनाने पुढाकार घेऊन शेतकरी संघटना व साखर कारखाना अधिकारी यांच्यात समन्वय साधून बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले होते. परंतु, समन्वयाच्या अभावामुळे बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. १६) रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.
प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या उपस्थितीत बैठक घडवून आणावी, अशी मागणी स्वाभिमानी संघटनेने केली होती. त्यानुसार शुक्रवारी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु, साखर कारखानदारांना तहसील कार्यालयाकडून निमंत्रित केले नसल्याचे शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच या बैठकीबाबत
समन्वय बैठक न झाल्याने शेवगाव तहसील कार्यालयाबाहेर येऊन स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली.
संघटनेचे पदाधिकारी संतप्त..
बैठक न झाल्याने शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेवगाव तहसील कार्यालयात ठिय्या मांडला. यावेळी मोठी घोषणाबाजी केली. यावेळी शेतकरी
संघटनेचे छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष माउली मुळे यांनी प्रशासनाच्या निषेधाचा ठराव मांडल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याला अनुमती दिली. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेवगाव पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांची भेट घेऊन सोमवारच्या (दि. १६) अगोदर शेतकरी संघटना व साखर कारखानदार यांची बैठक न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक नागरे यांनी संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल. त्यामुळे रास्ता रोको करू नये, असे आवाहन केले.
साखर सहसंचालक कार्यालयाला ही कोणताही पत्रव्यवहार केला नसल्यामुळे साखर संघाचेही प्रतिनिधी हजर नव्हते. शेवगाव तहसील
कार्यालयाचा गलथान कारभार यास कारणीभूत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी सांगितले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष माउली मुळे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, ज्येष्ठ शेतकरी नेते मच्छिंद्र आर्ले, ताराचंद लोढे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, शेवगाव तालुकाध्यक्ष अशोक मेजर भोसले, तालुका उपाध्यक्ष अमोल देवढे, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गर्जे, प्रशांत भराट, हरिभाऊ कबड्डी, विकास साबळे, प्रगतशील शेतकरी ढोले मामा, शेषराव अपशेटे, हरिभाऊ काळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
Tags :
16071
10