शाळा बंद आंदोलनाच्या दिवसाचा पगार कपात होणार नाही.- आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सभागृहात मांडला प्रश्न
नगर सिटीझन live 24 न्यूज नेटवर्क-
दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील संस्था मुख्याध्यापक, शिक्षक -शिक्षकेतर संघटनांनी विविध मागण्यांसाठी शाळा बंद आंदोलन केले होते. यावर शिक्षण संचालक यांनी शिक्षक शिक्षकेतरांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचे आदेश काढले होते, त्याकरता आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आज हिवाळी अधिवेशन मध्ये विधिमंडळ प्रश्न उपस्थित करून, पगार कपात करू नये, अशी मागणी केली तसेच शाळा बंद असलेल्या दिवसाला आम्ही सुट्टीच्या दिवशी कामकाज भरून काढू व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही त्यामुळे पगार कपात करू नये अशी विनंती केली त्यानुसार शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी पगार कपातीचा आदेश रद्द केला जाईल असे उत्तर दिले.