महाराष्ट्र
8288
10
पाथर्डी नगरपरिषदेत दुरंगी लढतीचा मार्ग मोकळा
By Admin
पाथर्डी नगरपरिषदेत दुरंगी लढतीचा मार्ग मोकळा
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची नाट्यमय माघार
पाथर्डी: नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) गटाचे उमेदवार संजय भागवत यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. अध्यक्षपदासाठी आता दुरंगी लढतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
आम्ही दोन नंबरची पसंती दिलेल्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज मंजूर करावा अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करीत आम्ही मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रणजीत बेळगे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान संजय भागवत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ते लगेच नाँटरिचेबल झाले आहेत. पाथर्डी नगर पालिकेच्या अध्यक्षपदासाठी भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व राष्ट्रवादी (अजित पवार) गट अशी तिरंगी लढत होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर ज्या पालिकेत अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या बाबतीत
न्यायालयात अपील दाखल झाले, त्या पालिकेच्या निवडणुका दि.२ डिसेंबर ऐवजी २० डिसेंबरला घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्या नुसार पाथर्डीची निवडणूक २० डिसेंबरला होणार आहे.
अध्यक्षपदाच्या उमेदवाला माघारीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून उमेदवारांना १० डिसेंबर पर्यंत अर्ज माघारीला मुदत दिली होती. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे संजय भागवत यांनी बुधवारी अचानक उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. भागवत यांच्या माघारीनंतर भाजपच्या गोटात उत्साह संचरला आहे. तर अजित पवार राष्ट्रवादी पक्षाने निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते यांच्याकडे संपर्क साधुन आमच्या पक्षाचे दोन नंबर पसंतीचे उमेदवार राहुल विष्णु ढाकणे यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरावा अशी मागणी केली.
मात्र ढाकणे यांच्या उमेदवारी अर्जाला एकच सूचक असल्याने त्यांचा अर्ज बाद झालेला आहे.
माघार का याचे उत्तर सध्या कोणाकडे नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) गटाचे संजय भागवत यांनी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात न घेता उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. त्यांना कोणी काय सांगितले असेल ते जनतेला माहिती आहे. आम्ही दोन नंबर पसंतीचे उमेदवार म्हणुन राहुल विष्णु ढाकणे यांच्या अर्जाला एबी फॉर्म जोडलेला आहे. त्यांचा अर्ज वैध ठरवला जावा. अन्यथा आम्ही मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करु.
- रणजीत बेळगे (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाथर्डी)
मागील पंधरा वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठपणे होतो. याची दखल घेऊन मला पक्षाने उमेदवारी दिली. मात्र माझ्यासमोर दोन्हीही तुल्यबळ पक्षाचे उमेदवार असताना देखील मी पक्षाचा व पक्ष श्रेष्ठींचा आदेश शिरसावद्य माणून लढा दिला. मात्रा पाहिजे त्या प्रमाणात मला व नगरसेवक पदाच्या बहुतांशी उमेदवारांना पक्ष व श्रेष्ठींची पाहिजे त्या प्रमाणात साथ व रसद मिळाली नाही. यामुळे मी व माझे नगरसेवकपदाचे सहकारी उमेदवार यांची होत असलेली अडचण पाहून या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला आहे.
संजय भागवत (राष्ट्रवादी, अजित पवार गट)
त्यांना पाच सुचक असते तर त्यांचा अर्ज वैध ठरला असता. असे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते यांनी सांगितले. यावर समाधान न झाल्याने आम्ही न्यायालयात दाद मागू असे राष्ट्रवादीच्यावतीने स्पष्ट
करण्यात आले आहे. पाथर्डी नग पालिकेत आता भाजप व राष्ट्रवा शरद पवार गट यांच्यात थेट सामन रंगणार असल्याने आता कोणाला फायदा व कोणाला तोटा यांची चच्च रंगली आहे.
Tags :
8288
10




