शेतकऱ्यांच्या कांद्याचे पीक वाचवायचे की फक्त पाणी वाहताना बघायचे? शेतकऱ्यांचा सवाल
पाथर्डी तालुका-
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव परिसरात मुळा धरणाच्या कॅनॉलला सध्या उन्हाळी आवर्तन सुरू आहे. परंतु हे आवर्तन उशिरा आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत.
सध्या शेतकऱ्यांच्या शेतात कांद्याचे पीक अंतिम टप्प्यात आहे आणि त्याला शेवटच्या एक-दोन पाण्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कॅनॉलच्या पाटावर मोटारी लावून पाणी घेण्यास सुरुवात केली.परंतु
मुळा पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी गावात येवून शेतकऱ्यांना १५ मार्चपर्यंत (१० दिवस) मोटारी बंद ठेवण्याचे आदेश दिले.
आता प्रश्न पडला आहे की,
जर या १० दिवसात कांद्याला पाणी मिळाले नाही तर पीक वाचणार कसे?१५ मार्चनंतर दिलेल्या पाण्याचा शेतकऱ्यांना काय उपयोग?
हजारो रुपयांचा खर्च करून उभे केलेले कांद्याचे पीक शेवटच्या टप्प्यावर आहे. अशा वेळी जर पाणी मिळाले नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
मुळा पाटबंधारे विभागाने जमिनीवरील वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ पाणी घेण्यास परवानगी द्यावी, ही सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांना पाणी नाकारून जर पाणी फक्त कॅनॉलमधून वाहू दिले, तर ते अत्यंत दुर्दैवी ठरेल.सहा तास लाईट आहे त्यामध्ये चार तास लाईट टिकते चार तास पाणी रोजचं शेतकऱ्यांना उपसा करता येते त्यातही जर पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांना वेठीस धरत असतील तर यावर काहीतरी पर्याय काढावा लागेल.असे अनेक शेतकऱ्यांचे मत आहे.