महाराष्ट्र
25383
10
नवजीवन डे स्कुल, मध्ये इ.१० वीच्या विद्यार्थ्यांचा ‘आशिर्वाद प्रदान सोहळा’ संपन्न
By Admin
नवजीवन डे स्कुल, मध्ये इ.१० वीच्या विद्यार्थ्यांचा ‘आशिर्वाद प्रदान सोहळा’ संपन्न
सिन्नर - प्रतिनिधी
श्रीमती पुष्पावती देशमुख नवजीवन डे स्कुल सिन्नर या विद्यालयात इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद प्रदान सोहळा संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री. सुभाषजी देशमुख ( बडे सर) चेअरमन सौ. विजयाताई देशमुख (बडे मॅडम) संचालक शिरीन देशमुख (दीदी) यांच्या मार्गदर्शनाने कायर्क्रमाची सुरवात झाली.
विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या शाळेप्रतीच्या भावना, शिक्षकांनी ज्ञानदाना सोबत केलेले चांगले संस्कार या बाबत विद्यार्थ्यांनी आपले विचार माडले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थानी सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण बेनके सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संगितले कि जीवनात नेहमी चांगल्या मित्रांशी संगत ठेवली तर तुम्ही यशाचे शिखर गाठल तसेच बोर्ड परीक्षेस सामोरे जातांना घ्येव्याची काळजी या बाबत मार्गदर्शन केले.व शुभ आशिर्वाद दिले
कार्यक्रमाचे मुख्यअथिती गुळवंच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मधुकर काळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना स्पष्ट केले कि अपयश हे आपल्या जीवनातील अभिन्न अंग असून अपयशाला खचून न जाता अपयशी धेर्याने लढा देणारच यशस्वी होत असतो सद्यास्थितीत समाजाकडून यशाची व्याख्या कोणती केली जाते तर विद्यार्थ्यांनी परीक्षामध्ये ९०% पेक्षा अधिक मार्क्स घेणे या बाबत श्री. काळे सर यांनी आपले मत मांडताना स्पष्ट केले की विद्यार्थ्यांनीचा सर्वांगीन विकास साध्याचा असेल तर पालक व शिक्षकांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करियर करून देण्याची गरजेची असून शिक्षकांनी शालेय जीवनात त्यांच्या आवडी निवडी कल ओळखून त्यांना प्रेरित करणे अपेक्षित आहे शाळेचे शिक्षणाधिकारी श्री. बी.बी. पाटील सर यांनी हि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात संस्काराचे स्थान अनमोल असून मातृ देव भव:!, पितृ देव भव:!, आचार्य देव भव:!, या प्रमाणे जीवन जगावे आपण उद्याचे एक आदर्श व संस्कार युक्त नागरिक असून विद्यार्थांना एस.एस.बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा व शुभ आशिर्वाद दिले या वेळी प्राचार्या श्री. अनिता सुर्यवंशी,व माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. सविता फड यांनी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या शुभेच्छा व शुभ आशीर्वाद दिले.या वेळी प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ प्रिती गुजराथी, श्री नरेंद्र वाघ सर, प्रल्हाद देशमुख, शरद शिंदे, निलेश भावसार, अमर बैरागी, सोनाली गीते, शेवटी सौ. गौरी परदेशी यांनी सर्वांचे आभार मानले.
Tags :
25383
10




