विद्यार्थ्यांच्या जडण घडणीत पालक, शिक्षकांची भूमिका महत्वाची-
By Admin
विद्यार्थ्यांच्या जडण घडणीत पालक, शिक्षकांची भूमिका महत्वाची-प्राचार्य डॉ.शेषराव पवार
श्री आनंद महाविद्यालयात पालक शिक्षक मेळावा संपन्न
पाथर्डी प्रतिनिधी: महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन व्यक्तिमत्व विकासासाठी पाल्य, पालक, शिक्षक यांच्या मध्ये संवाद व समन्वय हा खूप महत्त्वाचा भाग असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्री आनंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार यांनी केले.
महाविद्यालयात आयोजित पालक शिक्षक मेळावा कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान वरून बोलतांना त्यांनी आपले मत व्यक्त केले. पुढे प्राचार्य डॉ. शेषराव पवार म्हणाले की, जीवनात स्पर्धेच्या युगामध्ये सोशल मीडियाच्या अति, अयोग्य वापराबरोबरच पाश्चिमात्य संस्कृतीचा आधुनिकीकरण यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी हा गांगरलेला आसुन पालकांनी याबाबतीत जागरूकता बाळगणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक जडणघडणीमध्ये समाज कुटुंब व महाविद्यालय यांनी संस्कार व नीती मूल्याची जाणीव महाविद्यालय विद्यार्थ्याला करून देणे आज गरजेचे आहे.महाविद्यालय स्तरावर शिक्षण घेत असताना या महत्त्वाच्या भविष्य घडविण्याच्या टप्प्यावर पाल्य याच्या बाबतीत पालकांनी दक्ष राहून प्राध्यापकांबरोबरच विद्यार्थ्याच्या भविष्य घडवण्यामध्ये हातभार लावावा. समाजातील सध्याची नोकरीची उपलब्धता व्यवसाय स्पर्धा याकडे विद्यार्थ्यांनी डोळसपणे पाहून पालक घेत असलेले कष्ट व महाविद्यालय अविरतपणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी घेण्यात येणारे उपक्रम यांची जाणीव ठेवावी. महाविद्यालयामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या सर्वच उपक्रम हे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवत असतात. त्यामध्ये होणारा संस्कार हा पुढे भविष्यात उपयोगी ठरत असतो. यामुळे सर्व उपक्रमामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. पवार यांनी केले.
याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. प्रा. डॉ. भाऊसाहेब घोरपडे, प्रा. डॉ. जगन्नाथ बरसीले यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता व सोयी सुविधा याबाबतीत पालकांना ज्ञात केले.
याप्रसंगी पालक प्रतिनिधी श्री गणेश चातूर यांनी महाविद्यालयाबरोबर महाविद्यालय विषयी कृतज्ञता व्यक्त करत आजच्या काळात वाढत्या आधुनिक करण्याच्या अधिक अतिक्रमणामध्ये चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रबोधन करण्याची भविष्यात गरज पडेल काय? असा प्रश्न उपस्थित केला. याप्रसंगी पालक माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवर पालकांचे स्वागत प्रा. डॉ. बथुवेल पगारे व प्राचार्य डॉ. शेषराव पवार यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात आचार्य सम्राट आनंद ऋषीजी महाराज साहब यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बुथवेल पगारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.अनिता पावसे यांनी तर आभार प्रा. सूर्यकांत काळोखे यांनी मानले.

