स्व.मा.आ.राजीवजी राजळे यांच्या ५६व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन
By Admin
स्व.मा.आ.राजीवजी राजळे यांच्या ५६व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन
पाथर्डी- तालुका
“रक्तदान म्हणजे फक्त रक्त देणं नाही… तर एखाद्या जीवाला नवजीवन देणारी माणुसकीची सर्वात मोठी पूजा आहे.”
या भावनेने प्रेरित होत आज पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील न्यू इंग्लिश स्कूल, आदिनाथनगर येथे झालेल्या रक्तदान शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कार्यक्रमाला अपूर्व यश लाभले.
शिबिराचे उद्घाटन मा.जिल्हा परिषद सदस्य श्री.राहुलदादा राजळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन मा. रामकिसन आबा काकडे, कार्यकारी संचालक मा.नितीन शिंदे साहेब,रवींद्र महाजन, श्रीकांत मिसाळ, बाळासाहेब गोल्हार, चारुदत्त वाघ, गटशिक्षणाधिकारी मा. शिवाजीराव कराड साहेब, भास्करराव गोरे, संभाजी राजळे, विनायक म्हस्के, गणेश चितळे, वसंत पवार, नारायण मडके, ढमाल साहेब, आदिनाथ राजळे, संदीप नेहुल, प्रमोद काकडे यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
कार्यक्रम सुसंपन्न करण्यासाठी स्व. राजीवजी राजळे मित्र मंडळ – कासार पिंपळगाव आणि श्रीराम मित्र मंडळ – आदिनाथनगर यांनी सामूहिक आयोजन केले.
४७ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेची सर्वोच्च सेवा घडवली.
महिलांमधून धनेश्वरी काजळे मॅडम यांनी रक्तदान करून कार्यक्रमाला विशेष गौरव प्राप्त करून दिला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शीला नाथन मॅडम, अशोकराव काळे सर, राजीव सुरवसे सर, अरुण कराळे सर, मिलिंद गायकवाड सर, प्रशांत राजळे,सोनाली जवणे मॅडम, अर्चना जेधे मॅडम, कावेरी चितळे मॅडम यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक मंगल झाला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतलेले कार्यकर्ते:
अंकुश राजळे, अरुण राजळे, आनंत राजळे, रमेश भुसारी, बाळासाहेब म्हस्के, वैभव वाघ, अभिजीत राजळे, रवींद्र दूधमल, अनिल खरड, अंकुश जगताप,गणेश काकडे, आप्पासाहेब राजळे, सचिन राजळे, ज्ञानेश्वर हरार,अक्षय तिजोरे,नितीन साखरे, कैलास गिरी, शेरकर, अतुल राजळे, प्रशांत आहेर, देवेंद्र आंधळे, शुभम राजळे, आदिनाथ तांदळे यांनी दिवसभर मेहनत घेतली.
विद्यार्थ्यांमध्ये वही–पेन–कंपास वाटप करून स्व. राजीवजींच्या स्मृतीला साजेशी सामाजिक मूल्यांची परंपरा जपण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी आदर्श ग्रामसेवक श्री. प्रमोद मस्के भाऊसाहेब यांनी सूत्रसंचालन करून सिव्हिल सर्जन ब्लड बँक टीम —
डॉ. सुमय्या खान, संपत आंधळे, गर्जे साहेब, अभिजीत खरात, प्रियंका मॅडम, रोहिणी दिवटे, सुहानी विखे, रूपाली दुसुंगे, वेदांती देशमुख, दीपक पवार, मोहन पोकळे, विशाल चावरे, अशोक पवार
यांचा सन्मानपूर्वक गौरव करून आभार प्रदर्शन केले.
रक्तदान — एका थेंबातून उजळणारी आशेची ज्योत, आणि माणुसकीचा खरा उत्सव!
31585
10




