महाराष्ट्र
मतमोजणीसाठी १ हजार २५९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
By Admin
मतमोजणीसाठी १ हजार २५९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार
अहिल्यानगर दि.२२
जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरूवात होणार असून मतमोजणीसाठी १ हजार २५९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी टपाली मतदानाची मतमोजणी सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने ईव्हीएम यंत्राची मतमोजणी सुरू होईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
मतमोजणीसाठी एकूण उपलब्ध १ हजार ३८५ मनुष्यबळापैकी १ हजार २५९ अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्षात मतमोजणी कामासाठी नियुक्त असणार आहेत. या मनुष्यबळाची पहिली सरमिसळ १६ नोव्हेंबर, दुसरी २१ नोव्हेंबर रोजी झाली असून तिसरी सरमिसळ मतमोजणीच्या दिवशी पहाटे ५ वाजता करण्यात येईल.
अकोले विधानसभा मतदार संघासाठी मिटींग हॉल तहसील कार्यालय नवीन इमारत ता. अकोले, संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल, ता. संगमनेर, शिर्डी – प्रशासकीय इमारत, तळमजला, तहसील कार्यालय राहाता, कोपरगाव – सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल, तळमजला, ता. कोपरगाव, श्रीरामपूर – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, पहिला मजला, ता. श्रीरामपूर येथे मतमोजणी होईल.
नेवासा मतदारसंघासाठी न्यू गव्हर्नमेंट ग्रेन गोडाऊन, उत्तर बाजू खोली क्र.२ संथ मेरीस् स्कुल रोड, मुंकुदपुरा नेवासा फाटा, ता.नेवासा, शेवगाव – शासकीय इमारत तळमजला तहसील कार्यालय शेवगाव, राहुरी – लोकनेते रामदास पाटील धुमाळ न्यु आर्टस सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेज राहुरी इनडोअर स्पोर्ट्स हॉल राहुरी, पारनेर – औद्यागिक प्रशिक्षण संस्था वर्कशॉप पारनेर, अहमदनगर शहर – महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन नं.६ एम.आय. डी.सी. नागापूर अहिल्यानगर, श्रीगोंदा – गव्हर्नमेंट ग्रेन गोडाऊन नं.३, पेडगाव रोड श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी बॅडमिंटन हॉल, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे मतमोजणी होईल.
अकोले मतदारसंघातील ३०७ मतदान केंद्रांसाठी मतमोजणीच्या २२ फेऱ्या होतील. संगमनेर २८८ आणि २१ , शिर्डी २७१ आणि २०, कोपरगाव २७२ आणि २०, श्रीरामपूर ३११ आणि २३, नेवासा २७६ आणि २०, शेवगाव ३६८ आणि २७, राहुरी ३०८ आणि २२, पारनेर ३६६ आणि २७, अहमदनगर शहर २९७ आणि २२, श्रीगोंदा ३४५ आणि २५, तर कर्जत जामखेड मतदारसंघातील ३५६ मतदान केंद्रांसाठी मतमोजणीच्या २६ फेऱ्या होतील. प्रत्येक मतदारसंघात ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात येणार असून प्रत्येक टेबलसाठी त्यासाठी प्रत्येकी १ पर्यवेक्षक, सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येईल.
टपाली मतदानासाठी अकोले मतदारसंघात ७ टेबल, संगमनेर आणि कर्जत जामखेड ९, शिर्डी आणि कोपरगाव ४, नेवासा आणि अहमदनगर शहर ६, श्रीरामपूर ५, शेवगाव १०, पारनेर १२, श्रीगोंदा मतदारसंघात ११ टेबलवर मतमोजणी होईल. प्रत्येक टेबलवर १ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, १ पर्यवेक्षक, २ सहाय्यक आणि १ सूक्ष्म निरीक्षक असतील.
ईटीपीबीएस स्कॅनिंगसाठी अकोले, शिर्डी, कोपरगाव आणि श्रीरामपूर मतदारसंघात २ टेबल, संगमनेर, पारनेर अणि श्रीगोंदा मतदारसंघात प्रत्येकी ५, नेवासा, अहमदनगर शहर आणि कर्जत जामखेड मतदरसंघात प्रत्येकी ३, शेवगाव ४ आणि राहुरी मतदारसंघात ६ टेबलवर व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर १ पर्यवेक्षक आणि १ सहाय्यकांची नियुक्ती करण्यात येईल.
याशिवाय मतमोजणीच्या वेळी प्रत्येक निवडणूक मतमोजणी निरीक्षकांच्या मदतील दोन सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीची आकडेवारी तपासण्यासाठी हे सूक्ष्म निरीक्षक सहकार्य करतील.
Tags :
140807
10