Breaking news- 'या' दिवसापासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार
By Admin
Breaking News -, 'या' दिवसापासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 19 एप्रिल 2021
वाढत्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत बैठक घेतली. त्या बैटखीनंतर हा निर्णय घेण्यात आला. देशातील जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण व्हावं, यासाठी सरकार गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.
देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा
कोरोना लसीकरणाची तिसरी मोहीम 1 मेपासून सुरु करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात कंपन्यांना लस खुल्या बाजार विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कंपन्यांनी एका महिन्यात निर्मिती केलेल्या लसीच्या 50 टक्के लसी सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीला म्हणजे केंद्र सरकारला द्यायच्या आहेत. उरलेल्या 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खुल्या मार्केटला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत लसीकरण हेच कोरोना विरुद्धच्या लढाईतील मोठं शस्त्र असल्याचं म्हटलं आहे. डॉक्टरांनी रुग्णांना कोरोनावरील लस घेण्यास प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन मोदींनी केलं आहे. नरेंद्र मोदींनी देशातील डॉक्टर आणि मेडिकल फार्मा कंपन्यांशी चर्चा केली. मोदींनी यावेळी कोरोना टियर 2 आणि टियर 3 मधील शहरांमध्ये वाढत असल्याचं जाहीर केलं आहे. यापूर्वी 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस देण्यात येत होती. आता तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांना लस मिळणार आहे.