देशाच्या महिला क्रिकेट टीम मध्ये खेळून भारत देशाचे प्रतिनिधित्व करीन-जितेश्री डमाळे
जितेश्री डमाळेचा मनसे कडून सन्मान
पाथर्डी प्रतिनिधी:
एस. व्ही. नेट क्रिकेट अकॅडमीची खेळाडु जितेश्री डमाळे हिची इंडिया वेस्ट झोन ट्रायल साठी निवड झाल्याने मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष अंबादास शेळके, सचिन पालवे, उमेश दहिफळे यांनी जितेश्री डमाळे हिच्यासह वडील विष्णु डमाळे, आई मनीषा डमाळे यांचा सत्कार केला.
यावेळी अविनाश पालवे म्हणाले की, आपल्या तालुक्यातील मुलगी एवढ्या मोठ्या उंचीवर गेल्याचा सार्थ अभिमान असून तिच्या आई-वडिलांनी तिला भक्कम साथ दिली. तिला खेळू दिले, म्हणून त्यांचेही विशेष कौतुक करावे लागेल. यावेळी सर्वांनी जितेश्री हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच जितेश्री हिने " मी खूप परिश्रम करून देशाच्या महिला क्रिकेट टीम मध्ये खेळून भारत देशाचे प्रतिनिधित्व करीन, " असा विश्वास व्यक्त केला.