महाराष्ट्र
5706
10
फटाका मुक्त दिवाळी साजरी करणे तसेच किल्ले बांधणी करणे म्हणजे निसर्ग प्रेमाचा आणि सामुदायिक ऐक्याचा
By Admin
फटाका मुक्त दिवाळी साजरी करणे तसेच किल्ले बांधणी करणे म्हणजे निसर्ग प्रेमाचा आणि सामुदायिक ऐक्याचा महासोहळा आहे.- सुभाष बर्डे
पाथर्डी तालुका- उद्याचे विद्यार्थ्यांंचे समाजासाठी सर्वस्व: अर्पण करणारे सामाजिक कार्य तसेच विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे आणि सकारात्मक बदलासाठी सतत कार्यरत राहून निसर्गाशी नातेजपणारी शिकवण द्यावी लागणार आहे असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे यांनी व्यक्त केले.
हनुमान टाकळी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत फटाके मुक्त दिवाळी निबंध स्पर्धा तसेच किल्ले बांधणी स्पर्धा यांचें सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना
गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी सुभाष बर्डे हे होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख मच्छिंद्र गोरे सर, वृ.स. साखर कारखान्याचे संचालक कुशीनाथ बर्डे, गावच्या सरपंच मीनाताई शिरसाठ, ग्रा पं सदस्य निलेश काजळे, बाळासाहेब बर्डे, सामाजिक कार्यकर्ते संतोष कर्डीले, जगतमित्र अभिजित दगडखैर मुख्याध्यापक संभाजी बेरड आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना बर्डे म्हणाले की, अन्न,वस्त्र,निवारा याही पेक्षा शुद्ध हवा मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. याबाबत शासन पातळीवरूनही विशेष प्रयत्न केले जात आहेत. हनुमान टाकळी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत हा उपक्रम ५ वर्षांपासून चालू आहे. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आणि गावकरी बांधवांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चौकट:::
( पाथर्डी/शेवगाव तालुक्याच्या आमदार मोनिका ताई राजळे यांचा १९ फेब्रुवारी हा वाढदिवस. पण् वाढदिवसाच्या निमित्ताने कोणीही हार,गुच्छ, शाल, जाहिरातींवर खर्च न करता सामाजिक उपक्रमात सहभाग द्यावा अशा सुचना आमदार साहेबांनी कार्यकर्त्यांना दिल्यामुळे चेअरमन सुभाष बर्डे यांनी हनुमान टाकळी प्राथमिक शाळेला ५००० रूपयांची देणगी दिली.) त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी क्लॅपिंग करून आ मोनिका ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुणे मच्छिंद्र गोरे सर म्हणाले की, खरं तर अंनिस आणि गावकरी यांचं मनःपूर्वक कौतुकच केले पाहिजे. कारण शालेय शिक्षणाशिवाय विद्यार्थ्यांना बाह्य जीवन शिकवले जाते. वैज्ञानिक दृष्टिकोन कृतीतून येथे शिकवला जातो. ही बाब निश्चितच इतरही शाळांनी आदर्श घेण्यासारखी आहे. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केली. छत्रपती शिवाजीराजे यांच्या जीवन चरित्रावर शहादेव काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संयोजन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड यांनी केले. सुत्रसंचलन तुळशीराम खेडकर यांनी केले.तर आभार मुख्या. संभाजी बेरड यांनी मानले. रेखा म्हस्के, सुनिता गुंजाळ, सीमा पालवे,सावळेराम थोरात यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Tags :
5706
10




