महाराष्ट्र
202125
10
निरोगी आयुष्यासाठी योगा महत्वाचे
By Admin
निरोगी आयुष्यासाठी योगा महत्वाचे- आमदार मोनिकाताई राजीव राजळे
पाथर्डी- (आदिनाथनगर) दादापाटील राजळे कला आणि विज्ञान महाविद्यालयात शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग , राष्ट्रीय सेवा योजना आणि करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.२१जून २०२५ रोजी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या शुभहस्ते शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. दादापाटील राजळे व स्व. राजीवजी राजळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांनी सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने निरोगी आयुष्यासाठी वेळ काढून योगा, व्यायाम केला पाहिजे असा संदेश दिला व सर्वांना योग दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर यांनी या प्रसंगी आमदार मोनिकाताई राजीव राजळे व उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. रोहित आदलिंग यांनी आयुष मंत्रालयाकडून योग दिना साठी देण्यात आलेल्या निर्देशानुसार योगासने प्राणायाम याविषयी मार्गदर्शन केले. सर्व प्रात्यक्षिके देण्यात आली.
या वेळी संस्थेचे विश्वस्त मा. श्री. सुभाषराव ताठे, मा. श्री. कुशिनाथ बर्डे, मा. श्री. राधाकिसन राजळे, मा. श्री. सोपानराव तुपे, मा. श्री. सचिन नेहुल,मा. श्री. दिलीप कचरे हे उपस्थित होते. तसेच दादापाटील राजळे महाविद्यालय, डॉ. आण्णासाहेब शिंदे कृषी तंत्रनिकेतन, लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी या सर्वांनी योग प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला.
सदरील कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. रोहित आदलिंग यांनी काम पाहिले. तर कार्यक्रमाचे आभार डॉ. आसाराम देसाई यांनी मानले. सुत्रसंचालन डॉ. किशोरकुमार गायकवाड यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक यांनी परिश्रम घेतले.
Tags :
202125
10





