महाराष्ट्र
9666
10
युवकांनी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे रहावे - एन. बी. धुमाळ
By Admin
युवकांनी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे रहावे - एन. बी. धुमाळ
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्याचे भाग्यविधाते, श्री.वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लि. व श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकारमहर्षी स्व.दादापाटील राजळे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त स्मृती व्याख्यानमालेच्या दुसऱ्या व्याख्यान प्रसंगी उद्योजक, लेखक व वक्ते श्री एन. बी. धुमाळ यांनी 'युवकांनो उद्योजक बना' या विषयावर आपले विचार व्यक्त केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी पुढे असे सांगितले की मुलांनी शिक्षण घेऊन नोकरी शोधण्यापेक्षा उद्योजक व्हावे. छोट्या मोठ्या व्यवसायातूनच उंच झेप घेता येते. पोटाची भूक भागवण्यासाठी एक वेळ जेवणाची आवश्यकता असते तर आयुष्यभराची भूक भागवण्याची ताकद पुस्तकांत आहे. ज्ञान हे यशाचा मूलमंत्र आहे. युवकांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे व त्यात उत्तुंग भरारी गाठण्यासाठी अहोरात्र कष्ट करावेत. विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. मोबाईच्या रील मधून वेगळे होऊन रियल आयुष्यामध्ये जगण्याच्या संधी शोधाव्यात. परिस्थिती व घटना बदलत असतात, त्याप्रमाणे योग्य निर्णय घेऊन आपली वाटचाल असावी. जे मिळाले ते सर्वोत्तम आहे, असे मानून स्वप्रयत्न, स्वकष्टाने व जिद्दीने आपले ध्येय साध्य करावे. आपले ध्येय हे नेहमी उच्चकोटीचे असावे. योग्य आदर्श आपल्या डोळ्यासमोर असावेत. जग खूप झपाट्याने बदलत आहे तेव्हा आपण काळजीपूर्वक आर्थिक व्यवहाराकडे पाहिले पाहिजे. जीवन जगत असताना सकारात्मक दृष्टिकोनाचे फार मोठे महत्त्व आहे. याच बरोबर सामाजिक समस्येवर विचार मंथन करताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली. आपल्या ओघवत्या वाणीत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी स्वलिखित 'यशाचे १११ मंत्र' या पुस्तकाच्या प्रती महाविद्यालयाचे ग्रंथालयास भेट दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जे. एन. नेहुल यांनी केले तर आभार डॉ. मेहबूब तांबोळी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र इंगळे व डॉ. किशोरकुमार गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ संचालक श्री उद्धवराव वाघ यांनी स्व. दादापाटील राजळे (भाऊ) यांच्या स्मृतीस उजळा दिला. याप्रसंगी महाविद्यालयातून निवृत्त झालेले डॉ.सुभाष भगवान देशमुख, डॉ. सुभाष जगन्नाथ देशमुख, डॉ.जालिंदर कानडे, प्रा. गोरक्ष अकोलकर, श्री विष्णू साप्ते यांचा सपत्नीक सत्कार महाविद्यालयातर्फे करण्यात आला. राहुलदादा राजळे यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आढावा घेतला व सर्वांचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी प्रा दशरथ खोसे, डॉ. यशवंतराव गवळी, रामकिसन काकडे, बाबासाहेब किलबिले, बापूसाहेब पाटेकर, पोपटराव आंधळे, आर. वाय. मस्के, दत्तात्रय भगत, सुनील ओव्हाळ, संदीप लोखंडे, नानासाहेब देशमुख, सुनील पुंड, शहाने सर, प्राचार्य राजधर टेमकर, प्राचार्य शांताराम खणगे, प्राचार्य सुनील पानखडे, प्राचार्य अशोक काळे, मुख्याध्यापक अशोक ताठे, संस्थेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर वृंद, परिसरातील नागरिक- पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags :
9666
10




