महाराष्ट्र
फार्मर आयडी' नोंदणीसाठी जिल्ह्यातील १४ गावांची निवड
By Admin
फार्मर आयडी' नोंदणीसाठी जिल्ह्यातील १४ गावांची निवड
तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक करणार काम
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेतकऱ्याच्या 'फार्मर युनिक आयडी' नोंदणीसाठी नगर जिल्ह्यात कामाला सुरुवात झाली आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे १४ गावांची निवड करण्यात आली असून या ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक शेतकऱ्यांच्या फार्मर युनिक आयडीच्या नोंदी घेणार आहेत. यासाठी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून लवकरच तालुका पातळीवरील प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नोंदणीला सुरुवात होणार आहे.
सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना 'फार्मर युनिक आयडी' देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या संपूर्ण माहितीची संचिका, त्यांच्या हंगामी पिकांची माहितीची डिजिटल पद्धतीने नोंदणी आणि शेतजमिनीच्या मालकीची ऑनलाईन नोंद करण्यात येणार आहे. हे काम तीन प्रकारात करण्यात येणार असून यातील पहिला भाग म्हणजेच शेतकऱ्यांची डिजीटल ओळख असणाऱ्या युनिक आयडी नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी गुरुवारी जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झाले असून दोन दिवसात तालुका पातळीवर प्रशिक्षण झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यात ३३१६ गावांपैकी प्रत्येक तालुक्यातून एक या प्रमाणे १४ गावांची निवड करण्यात आली आहे.
या गावात प्रत्यक्षात नोंदणीचे काम करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक नियुक्त करण्यात आले आहे. या सर्वांना गुरुवारी नगरला प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती
योजनेचा फायदा
या गावांची झाली निवड
सुलतानपूर (पारनेर), घोयेगाव (कोपरगाव), सांगवी खु. (पाथर्डी), राक्षी (शेवगाव), राजुरी (जामखेड), औटेवाडी (कर्जत), सुरोडी (श्रीगोंदा), घोडेगाव (नेवासा), चिखलठाण (राहुरी), खंडाळा (श्रीरामपूर), रायते (संगमनेर), नांदूर खुर्द (राहाता) आणि बुरूडगाव (अहिल्यानगर)
जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
सरकारच्या वतीने शेतकरी युनिक आयडी नोंदणी कार्यक्रम हा पूर्णपणे महसूल पातळीवर राबवण्यात येणार आहे. त्यासाठी उपजिल्हाधिकारी महसूल अतुल चोरमारे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी युनिक आयडीचा उपयोग होणार आहे. यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तरच त्यांना फार्मर आयडी मिळणार आहे. या उपक्रमात शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी, गावाचे नकाशे यांच्या नोंदी डिजिटल केल्या जाणार आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना सेवा आणि सुविधा त्यातून मिळू शकतील. त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी अॅग्रीटेक नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले आहे. त्यातून पीक संरक्षण, जमिनीचे आरोग्य यासह अन्य माहिती एकत्र करून त्यावर आधारित सपोर्ट सिस्टीम उभारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना फार्मर आयडी अनेक कामांसाठी उपयुक्त ठरणार असून, त्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.
शेतकऱ्यांची व त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटणार आहे. शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांची नोंद होऊन क्षेत्र निश्चित होईल. (जिओ रेफरन्सिंग) त्यांच्या नोंदी भूमिअभिलेख विभागाकडे स्वतंत्रपणे होणार आहेत. यासह फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना मिळणारे पीककर्ज, पीक विमा, पंतप्रधान किसान योजनेत मिळणारा लाभ यांच्या ऑनलाईन नोंदणीसह डीबीटी योजनेतही या आयडीचा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.
Tags :
74476
10