महाराष्ट्र
कलागुण विकासासाठी सांस्कृतिक कार्यक्रम काळाची गरज
By Admin
कलागुण विकासासाठी सांस्कृतिक कार्यक्रम काळाची गरज-पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे
विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने पाथर्डीकर मंत्रमुग्ध
पाथर्डी प्रतिनिधी:
आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध प्रकारचे गुण असणे महत्त्वाचे आहे. आजचा विद्यार्थी बहुआयामी व्यक्तिमत्त्व संपन्न तयार झाला पाहिजे, यासाठी प्रत्येक शाळेने सांस्कृतिक कार्यक्रम विद्यालयात आयोजित करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी केले.
पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर पाथर्डी या विद्यालयाचा स्नेहसंमेलन (गॅदरिंग) नुकताच उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड होते. ते म्हणाले की, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा अष्टपैलू व्यक्तिमत्व संपन्न विद्यार्थी घडेल या दृष्टीने विद्यालयात विविध उपक्रम आयोजित केले जातात. संस्थेला पालक वर्गांचे भरपूर सहकार्य व प्रतिसाद लाभत आहे. विविध गुणदर्शन (गॅदरिंग)कार्यक्रमात ५२३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध कला गुणांचा अविष्कार सादर केला. विविध कथानकातून समाज प्रबोधन करण्यात आले.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आज कुटुंब व्यवस्था दिवसेंदिवस बदलत चालली आहे.नात्यांमध्ये दुरावा वाढत चाललेला आहे, यासाठी नात व आजी-आजोबा या नाटिकेतून आजी आजोबा व नात यांच्यात असणारे प्रेम, माया , माणुसकी हे कथानक पाहून प्रेक्षकांची डोळे पाणावले व मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी चित्रपतील सदाबहार गीतांवर नृत्य सादर केले. यात देशभक्ती,देवीचा गोंधळ, विविध क्रांतिकारकांचे कार्य तसेच शिक्षक,शेतकरी यांचे कथानक सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. महाराष्ट्राचे लोकनृत्य लावणी व चित्रपटसृष्टीतील विविध अभिनेते यांचे कथानक तयार करून नृत्य सादर करून अभिवादन केले.
सर्व कार्यक्रमासाठी पालकवर्ग व पाथर्डीकरांनी भरपूर प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर गायके यांनी तर सूत्रसंचालन अनुजा कुलकर्णी व जयश्री एकशिंगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनीषा गायके, आशा बांदल, राधिका सरोदे ,ज्योती हंपे,किर्ती दगडखैर, विद्या घोडके, दीपक राठोड,ऋषिकेश मुळे,ज्ञानेश्वरी मुऱ्हे, अनिता भावसार, लक्ष्मी सोनवणे,रावसाहेब मोरकर, प्रमोद हंडाळ , सतीश डोळे,अभिजीत सरोदे, संदीप धायतडक, विठ्ठल धस व सुप्रसिद्ध कोरिओग्राफर गोपी तरटे व त्यांची टीम तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Tags :
18982
10