भालगाव येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस स्मार्ट इंटरॅक्टिव्ह बोर्ड भेट
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे महाराष्ट्राची लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली.
मुंडे जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायत भालगावच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व क्लास शाळेस विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे ७ स्मार्ट इंटरॅक्टिव्ह बोर्ड देण्यात आले.
याप्रसंगी शिक्षक नेते सुरेश खेडकर, विस्तारअधिकारी हबीब मुंडे, केंद्रप्रमुख श्री पोळ यांनी विद्यार्थ्यांना स्व. गोपीनाथ मुंडे यांचे जीवन चरित्र, सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती दिली.
यावेळी भालगावचे सरपंच पोपटराव रोकडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैजनाथ खंदारे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब खेडकर, मा. सरपंच सुदाम खेडकर, भगवाननगर शाळेचे मुख्याध्यापक नवनाथराव खेडकर, कासळवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंदे, मच्छिंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक दिलीप पवार, खरमाटवाडी शाळेचे मुख्याध्यापक दिलीपराव खेडकर, भालगाव शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वडते,आदर्श शिक्षक श्री केदार,श्री आरेकर, श्री मेंढे, श्री गणेश सुपेकर, अण्णासाहेब खेडकर, महादेव खेडकर, ज्ञानेश्वर रोकडे, राऊतबाबा, बाळासाहेब खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.