मुळा उजवा कालव्याचे आवर्तन पाथर्डी पाटचारीला सोडवा.- मा.जि.प.सदस्य शिवशकंर राजळे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - मंगळवार 04 मे 2021
पाथर्डी तालुक्यातील मुळा पाटबंधारे क्षेञातील कासार पिंपळगाव,चितळी,पाडळी,साकेगाल,सुसरे,हनुमान टाकळी,चितळी गावातील पाटचारीला तातडीने पाणी सोडण्याची मागणी लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ साहेब, ऊर्जा तथा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,मा.कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग अ.नगर यांना इमेल द्वारे पञ पाठवून मा.जिल्हा परीषद सदस्य शिवशंकर राजळे यांनी मागणी केली आहे.तसेच तालुक्यातील पाडळी येथील
शेतकरी संघटनेचे रमेश कचरे,बाळासाहेब गर्जे, सरपंच अशोकराव आमटे,संदीप राजळे, अरविंद भगत, विष्णुभाऊ सातपुते, ज्ञानेश्वर सातपुते, वृद्धेश्वर कंठाळी ,सुरेश उदागे,लहू तांभोरे,संदीप सातपुते आदी शेतकऱ्यांनी मा. जि. प. सदस्य राजळे यांना पाणी सोडण्यासंबधी मागणी केली होती.
मुळा पाटचारी क्षेत्रात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ऊस, भुईमूग,कांदा,उन्हाळी बाजरी,मका यासारखी पिके तसेच संञा,दांळीब,पपई,पेरु यासारख्या फळबागा आहेत.परीसरातील विहीरींनी आता तळ गाठला आहे.
या पिकांना पाण्याची अत्यंत गरज असून मे महीना असल्याने उष्णतेचे प्रमाण वाढले असुन शेतीच्या पिकासाठी मुळा पाटचारीचे पाणी सोडणे गरजेचे आहे.असे शिवशंकर राजळे यांनी सांगितले आहे.