कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर डाॕक्टरला मारहाण,दोन व्यक्तीवर गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी 20 मे 2021,गुरुवार
अहमदनगर जिल्ह्यातील घटना आयसीयूमध्ये उपचार घेत असलेला ७२ वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना मारहाण करत रुग्णालयात तोडफोड केली. तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरातील तारकपूर परिसरातील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. आयसीयूमध्ये काम करणारे डॉ. राहुल अरूण ठोकळ (रा. सारोळा कासार, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी त्यांच्यासह प्रवीण गायकर यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पंकज गडाख (वय ३०) व त्याचा मावस भाऊ रोहन पवार (वय २१, दोघे रा. टाकळ काझी, नगर) यां दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी सांगताच दोघेही चिडले. डॉक्टरांना शिवीगाळ करू लागले. डॉ. ठोकळ ओपीडीमध्ये आले. या दोघांनी तेथे येऊन त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. सकाळी तुमच्याकडे पाहून घेतो. तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली. असे म्हणत आरोपींनी ओपीडीमध्ये तोडफोड केली. त्यांच्यापासून वाचण्यासाठी डॉक्टर आणि सोबतचे कर्मचारी रासकर पुन्हा आयसीयूमध्ये गेले. तर आरोपींनी तेथे जाऊन त्यांची कॉलर पकडून त्यांना ओपीडीमध्ये खेचून आणले. तेथे पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे हॉस्पिटलमधून पोलिसांना माहिती देण्यात आली