पाथर्डी तालुक्यातील 'या' गावात विहीरीत पडलेल्या हरणाला जीवदान
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 18 मे 2021, मंगळवार
पाथर्डी तालुक्यातील लोहसर खांडगाव येथील शेतकरी बाळासाहेब चव्हाण यांच्या विहिरीत पडलेल्या हरणाला तिसगाव वनपरिक्षेञ विभागाचे वनरक्षक के.बी.वांढेकर यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन जीवदान दिले.बाळासाहेब चव्हाण या शेतकऱ्यांच्या खोल सात परस विहिरीतमध्ये एक हरीण पडल्याची माहीती चव्हाण यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कळविली.त्या नंतर वन परिक्षेञ अधिकारी दादासाहेब वाघुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक वांढेकर यांनी तात्काळ खोल विहीरीत उतरुन हरणाला बाहेर काढून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.वनरक्षक वांढेकर यांच्यामुळे हरीणाचे प्राण वाचले आहे.