महाराष्ट्र
3008
10
अहमदनगर जिल्ह्यात तीनशे पेक्षा अधिक मुलांना कोरोना
By Admin
अहमदनगर जिल्ह्यात तीनशे पेक्षा अधिक मुलांना कोरोना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या तीन दिवसांत 2 हजार 856 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे. त्यात सर्वात चिंताजनक बाब म्हणजे 318 बालकांना काेराेना संसर्ग झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत अनुक्रमे 712, 1 हजार 224 आणि 920, अशा एकूण 2 हजार 856 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. यात अनुक्रमे 79, 135 आणि 104 लहान बालकांना काेराेना संसर्गाचे निदान झाल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या तीन दिवसात वयोगट 1 ते 13 मध्ये 184 आणि वयोगट 14 ते 17 मध्ये 134 एवढ्या बालकांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.
पारनेर, संगमनेर, शेवगाव, श्रीगाेंदे, पाथर्डी हे काेराेना संसर्गाबाबत हाॅटस्पाॅट ठरले आहेत. संगमनेरमध्ये 20 तर, पारनेरमध्ये 43 गावांमध्ये उद्यापासून लाॅकडाऊन आहे. यावरून वाढत्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात येते. याच तालुक्यांत लहान बालकांना काेराेना संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या तीन दिवसांत पारनेरमध्ये 1 ते 13 वयाेगटातील 29, तर 14 ते 17 वयाेगटातील 19 जणांना, तसेच संगमनेरमध्ये 1 ते 13 वयाेगटात 28, तर 14 ते 17 वयाेगटातील 24 बालकांना काेराेना संसर्गाचे निदान झाल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या तीन दिवसांत कोरोनाचे निदान झालेल्या बालकांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे (कंसाच्या बाहेर वयाेगट 1 ते 13 आणि आतील 14 ते 17 वयाेगटातील आहे.) अहमदनगर शहर 5 (1), अकाेले ः 7 (12), जामखेड ः 17 (14), कर्जत ः 14 (15), काेपरगाव ः 8 (4), नगर तालुका ः 17 (4), नेवासे ः 5 (2), पारनेर ः 29 (19), पाथर्डी ः 11 (6), राहाता ः 5 (5), राहुरी ः 5 (4), संगमनेर ः 28 (24), शेवगाव ः 12 (9), शेवगाव : 12 (9), श्रीगाेंदे : 16 (12), श्रीरामपूर ः 5 (1).
तसेच, इतर जिल्ह्यांतून नगरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्यांमध्ये पाच लहान बालकांचा समावेश आहे.
Tags :

