महाराष्ट्र
पाथर्डीत बनावट शाळा दाखले,कागदपत्रे बनवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश!
By Admin
पाथर्डीत बनावट शाळा दाखले,कागदपत्रे बनवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश!
लष्कराच्या आयबी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचा छापा!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील उपनगरातील इमारतीमध्ये, विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी कामी बोगस दाखले व इतर कागदपत्रे बनवून देणाऱ्या दोघांना नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून नाशिक देवळाली कॅम्प येथील लष्कराच्या इंटेलीजंसच्या अधिकाऱ्यांनी या संबंधी पोलीसांना माहिती दिली होती. गुरुवारी पहाटे सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे कर्मचारी विनायक मासळकर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन मारुती आनंदराव शिरसाठ ( रा.जांभळी,ता.पाथर्डी ) व दत्तू नवनाथ गर्जे या दोघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी उशिरा दाखल होत सापळा लावून मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी बनावट ग्राहक म्हणून अभी माधव सहाणे ( वय २०, रा. साकुर, ता. इगतपुरी, नाशिक ) यास २ हजार रुपये देऊन पाठवले.
यावेळी संबंधित इसमाने त्यास पाथर्डी शहरातील नाथनगर येथील शनि चौका जवळच्या दुमजली इमारतीमध्ये नेऊन बनावट दाखला दिला. त्यानंतर खात्री होताच सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी धाड टाकून विविध संस्थेचे शिक्के, बनावट दाखले आदीसह विविध कागदपत्रे व साहित्य जप्त केले आहे.
याप्रकरणी मारुती आनंदराव शिरसाठ, रा. जांभळी, दत्तू नवनाथ गर्जे, रा. अकोला, कुंडलिक दगडू जायभाय रा. अनपटवाडी, ता. पाटोदा, मच्छिंद्र कदम रा. मानूर कासार, अजय उर्फ जय टिळे रा. वाडीवरे, ता. इगतपुरी शांताराम पंढरीनाथ अनार्थे रा. पिंपळद जि नाशिक यांनी एकत्र येऊन संगतमताने शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट दस्तावेज तयार करुन तो खरा आहे असे भासवून त्याचा शासकीय कामाकरिता गैरवापर करुन, सैन्यदलात मध्ये नोकरी मिळून शासनाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे.
या प्रकरणानंतर पाथर्डीतील बोगस शाळांचा विषय ऐरणीवर आला असून शिक्षण विभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याच्या चर्चा रंगली आहे.
Tags :
1686
10