शेतकऱ्यांनी माहीती तंत्रज्ञानाकडे वळून त्याच्या फायदा घ्यावा.- कृषि अधिकारी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर एमआरएजीएस योजने अंतर्गत मोठी फळ बाग लागवड होऊन चांगल्या पद्धतीचे काम शेतकऱ्यांसाठी येथील काम करणारे तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोरे व आमचे सर्व कृषी विभागातील सहकाऱ्यांनी केले असून यापुढेही याच पद्धतीची अधिक चांगले काम करू. बदलत्या जगाबरोबर शेतकऱ्यांनी शेती करताना माहिती तंत्रज्ञानाकडे वळून त्याचा फायदा करून घ्यावा, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी केले.
येथील गाडगे आमराईत शासकीय रोपवाटीकेत तालुका कृषी अधिकारी प्रविण भोर यांचा निरोप समांरभ व नव्याने तालुका कृषी अधिकारीपदी नियुक्त झालेले सुधीर शिंदे यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील कृषीसेवा केंद्र चालक, ठिबकसिंचन केंद्र चालक व तालुकाकृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते.