गायीचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर तालुक्यातील जेऊर शिवारातील पिंपळगाव तलाव परिसरात गंगाधर विठ्ठल माळी यांच्या घरासमोर बांधलेल्या गाईच्या अंगावर वीज पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे. जेऊरचे तलाठी सुदर्शन साळवे यांनी घटनेचा पंचनामा केला तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल कराळे यांनी गायीचे शवविच्छेदन केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दिनेश बेल्हेकर, बाळासाहेब पवार, रामदास बर्डे, उपस्थित होते.