पाथर्डी- नवीन पोलिस ठाणे 'या' ठिकाणी मंजूर करा.यांनी दिले निवेदन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी: शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील तिसगाव व बोधेगाव येथे दोन नवीन पोलिस ठाणे मंजूर करण्याच्या मागणीसाठी गृहमंत्री दिलीप वळसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शाहनवाज खान यांनी निवेदन दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार संग्राम जगताप आदी उपस्थित होते.
शेवगाव व पाथर्डी हे मराठवाड्याच्या हद्दीवर असलेले दोन मोठे तालुके आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे पोलिस यंत्रणेवर फार ताण पडतो, व तिसगाव व बोधेगाव येथे कोणत्याही प्रकारची घटना घडली असता नागरिकांना पोलिस ठाण्यात जाण्यासाठी लांब जावे लागते. त्यामुळे या गावातच पोलिस ठाणे झाले तर गावकऱ्यांना सोपे होणार आहे.