महाराष्ट्र
596
10
अहो तहसीलदार साहेब, मी जिवंत आहे
By Admin
अहो तहसीलदार साहेब, मी जिवंत आहे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहो तहसीलदार साहेब, मी जिवंत आहे. तुमच्या कार्यालयातील एका कोतवालाने, मी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभार्थी असतानाही मी मयत असल्याची नोंद कुठल्या कार्यालयाने दिली, हे समजेना. कुणीच माहिती देत नाही. मला न्याय द्या,' अशी विनंती वंचित लाभार्थी आण्णासाहेब काळे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
राहुरी तालुक्यातील काळे आखाडा येथील कायम रहिवासी असलेले आण्णासाहेब दामोदर काळे यांनी सांगितले की, 'मी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभार्थी आहे.मला केंद्र सरकारने या योजनेचा लाभ सुरू केला. पण काही दिवसांनी माझे खाते बंद झाले. राहुरी कृषी खात्याच्या कृषी सहायक यांच्या कडे चौकशी केली असता, तुमचे खाते तुम्ही मयत असल्याने बंद केले आहे. तशी माहिती वरिष्ठ कार्यालयातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या गेले आहे .काळे यांनी हयातीत असल्याचे शालेय जन्माचा दाखला, आधार कार्ड , फोटो सर्व कागदपत्रे पुराव्यानिशी सादर केले. त्यांनी तहसिलदार यांच्या कडे संपर्क साधावा, असे सांगितले. तहसिलदार साहेबांकडे विचारले असता त्यांनी अव्वल कारकुनाकडे जाण्याचे सांगितले .तेथे गेल्यावर समोरचे चित्र मनाला न पटणारे होते .सध्या तहसील कार्यालयात अव्वल कारकुनाच्या जागी चक्क कोतवाल काम करत होता. सध्या तहसील कचेरीत गावच्या सजे वर गावच्या हद्दीत गौनखणिज व वाळु उपसा रोखण्यासाठी प्रत्येक गावाला कोतवाल मानधनावर तैनात केले आहे. त्या कोतवालाल प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे कामच माहिती नाही. त्याला विचारले असता तुमचे प्रकरण नगरला पाठवले आहे, असे सांगण्यात आले. मी गेल्या वर्षी पासून लाभार्थी शेतकरी तहसील कार्यालयात हेलपाटे मारतो आहे, पण माझे खाते चालू झाले नाही,' असे ते म्हणाले.
Tags :

