युवानेते ऋषिकेश ढाकणे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड
या निवडीचे पाथर्डीत जल्लोषात स्वागत
पाथर्डी प्रतिनिधी:
बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक, युवानेते ऋषिकेश ढाकणे यांची नुकतीच जिल्हा नियोजन समितीवर (शासकीय ) निवड झाली.
या निवडीबद्दल पाथर्डी तालुका महाविकास आघाडीच्या वतीने फटाके फोडून, पेढे वाटून त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले.
त्याप्रसंगी शिवसेना विधानसभा मतदारसंघाचे संघटक भवानराव दराडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख, मुन्ना खलिफा, किशोर डांगे ,रवी पालवे, गणेश दिनकर, महेश दौंड, विकास फुंदे, माऊली खेडकर, वसंत खेडकर, राष्ट्रवादीचे नगरसेवक बंडू पाटील बोरुडे ,चाँद मणियार, हुमायून आतार ,रोहित पुंड ,सोमनाथ टेके, अक्रम आतार, सागर इधाटे, अनिकेत निनगुरकर, एम. पी. आव्हाड ,अनिल जाधव, शौकत शेख, प्रवीण फुंदे ,आनंद खाडे आदी उपस्थित होते.