मिलिंद गायकवाड यांना राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील आल्हणवाडी येथील व आदिनाथ नगर येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये कार्यरत असलेले शिक्षक मिलिंद गायकवाड यांना आदर्श कलाशिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
खारघर, मुंबई येथील हॉटेल थ्री स्टार येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबईच्या वतीने गायकवाड यांना आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
पालकांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांच्या कला गुणवत्तेविषयी सतत प्रयत्नशील राहणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात ते सतत पुढे असतात. अनेक वर्षापासून ते कलेची जोपासना करत आहेत. अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रमात ते चित्रप्रदर्शने देखील करत असतात. तसेच क्रांतिज्योती युवा प्रतिष्ठान आल्हनवाडी या संस्थेच्या माध्यमातून ते विविध सांस्कृतिक कार्यक्रम करत आहेत. या कार्याची दखल घेऊन गायकवाड यांना राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तुतज्ञ डॉ. रविराज अहिरराव, सुप्रसिद्ध गायक व शाहीर नंदेश उमप, ज्येष्ठ सिनेअभिनेता जयराज नायर, कर्करोग शास्त्रज्ञ डॉ. अमजद खान असद खान, पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखा सायबर सुयोग अमृतकर, मा. शिक्षण उपसंचालक सुरेश माळी आदी मान्यवर उपस्थित होते.