अहमदनगर जिल्ह्यातील सकाळच्या महत्त्वाचा ठळक बातम्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यातील सत्तेचा दुरूपयाेग करून नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक आणण्याचा डाव; नगर बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांचा आराेप
पाथर्डीतील श्री वृद्धेश्र्वर सहकारी कारखान्याची सुवर्णमहाेत्सव विशेष वार्षिक सभा ऑनलाईन झाली; नियाेजित वेळेत इथेनाॅल प्रकल्प उभारण्याची अध्यक्ष अप्पासाहेब राजळे यांची ग्वाही
नगर-मनमाड महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी राहुरीतील कृती समिती सदस्यांचे खड्ड्यात स्वतः बसून आंदाेलन; तीव्र आंदाेलन करण्याचा वसंत कदम आणि देवेंद्र लांबे यांचा इशारा
अहमदनगर जिल्ह्यात काल ७७६ जणांना काेराेना संसर्गाचे निदान; सध्या ५ हजार ६०५ रुग्णांवर उपचार सुरू
अहमदनगर शहरात नागरी सुविधा द्या, अन्यथा घरपट्टी माफ करा; सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बाेज्जा यांचे जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना निवेदन
चौदावा वित्त आयाेग आणि दलित वस्ती याेजनेच्या निधीच्या कामात ४० लाखांचा भ्रष्टाचार; जिल्हा परिषदेचा श्रीरामपूर शाखेचा अभियंता निलंबित