महाराष्ट्र
साखर खरेदीची निविदा ३ हजार ७०० ची असताना शेतकर्यांच्या ऊसाला २ हजार १०० चाच भाव का?
By Admin
साखर खरेदीची निविदा ३ हजार ७०० ची असताना शेतकर्यांच्या ऊसाला २ हजार १०० चाच भाव का?
सहवीज प्रकल्प तोट्यात असतांना पुन्हा प्रकल्पाचा अट्टाहास का?
सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेटे पाटील यांचा आरोप!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवाशाच्या आजी माजी लोकप्रतिनिधींकडून जनतेचा भ्रमनिरास!
साखरेचं खरेदी टेंडर ३ हजार ७०० रुपये असताना शेतकर्यांच्या ऊसाला अवघा २ हजार १०० चाच भाव का, मुळा कारखान्याचा सहवीज प्रकल्प तोट्यात असतांना पुन्हा वाढीव प्रकल्पाचा अट्टाहास का, असे प्रश्न सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेटे पाटील यांनी उपस्थित केले आहेत.
या संदर्भात अधिक भाष्य करताना ‘नेवाशाचा शेतकरी आजमितीला आधारहीन झाला आहे. या तालुक्यातल्या आजी आणि माजी आमदारांकडून सोयीचं राजकारण केलं जात आहे. त्यामुळे तालुक्यातील मतदारांचा प्रचंड असा भ्रमनिरास झाला आहे, असा आरोपही शेटे पाटील यांनी माजी आ. बाळासाहेब मुरकुटे
आणि विद्यमान आमदार, राज्याचे मंत्री शंकरराव गडाख
यांच्यावर केलाय.
फेसबुकवर लाईव्हमध्ये चर्चा करताना शेटे पाटील यांनी हा आरोप केला आहे. ते म्हणाले, ‘मुळा कारखान्याच्या
साखर खरेदीची तब्बल ३ हजार ७०० रुपये निविदा असताना शेतकर्यांच्या मुळा कारखान्याने ऊसाला अवघा २ हजार १०० रुपये भाव दिला आहे. संगमनेरच्या कारखान्याला कुठलेही अतिरिक्त उत्पन्न नसतानादेखील या कारखान्याने शेतकर्यांच्या ऊसाला विक्रमी भाव दिला. जर त्या कारखान्याला हे शक्य होत आहे तर मग मुळा कारखान्याला काय अशक्य आहे, असा मुद्दा उपस्थित करत मुळा कारखान्याचा सहवीज प्रकल्प तोट्यात असताना आणखी एका प्रकल्पासाठी ‘मुळा’चा आग्रह का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते शेटे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
यासंदर्भात अधिक भाष्य करताना शेटे पुढे म्हणाले, ‘मुळा कारखान्याची कार्यक्षमता वाढते आहे, ही चांगली बाब आहे. मात्र या भागातील शेतकर्यांचा ऊस तीन तीन महिने होऊनही नेला जात नाही. परिणामी ऊस उत्पादक शेतकर्यांच्या ऊसाचे टनेज घटते आणि नुकसान होते. आजमितीला याचा जाब विचारायला शेतकरी तयार नाही. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ताधार्यांना मतदारांनी फार मोठ्ठा नाही परंतू थोडासा झटका देण्याची आवश्यकता आहे.
माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर टीका करताना सामाजिक कार्यकर्ते शेटे म्हणाले, ‘माझी अन्य कोणत्याही भाजप कार्यकर्त्यावर नाराजी नाही. मात्र माजी आ. मुरकुटे यांनी सत्ताधार्यांच्या विरोधात शेतकर्यांच्या बाजूने लढणारा आक्रमक असा खमका नेता तयार व्हायला लागला, की माजी आ. मुरकुटे त्या नेत्याचे खच्चीकरण करण्यासाठी ‘प्लॅनिंग’ करतात. भाजपची सत्ता असतानादेखील माजी आ. मुरकुटे यांनी शिंगणापूर देवस्थान सत्ताधार्यांच्या ताब्यात दिले.
भेंड्याच्या कारखान्यात मदत केल्यास आपण नेवाशाच्या सत्ताधार्यांना अर्थात गडाखांना कुठलाही त्रास होऊ देणार नाही. अशा पध्दतीने माजी आ. मुरकुटे माजी आ. मुरकुटे हे महत्वाचे ‘प्लॅनिंग’ करत असल्याचा आरोपही शेटे यांनी केला. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख
यांच्यामुळे या भागाचा कायापालट झाला, हे नाकारुन चालणार नाही. मात्र आज मुळा कारखाना सुस्थितीमध्ये असतानाही या कारखान्याला यश मल्टिस्टेटकडून कर्ज घेण्याची गरजच काय होती, असा मुद्दा शेटे यांनी उपस्थित केला आहे.
‘नेवाशाचे तत्कालिन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या सत्ताकाळात कृृषी खात्यामध्ये मोठ्ठा आर्थिक घोटाळा झाला असून त्या घोटाळ्याची सखोल चौकशी आम्ही करु’, असे आश्वासन त्यावेळचे माजी आ. गडाख यांनी दिले होते. मात्र गडाख हे आघाडी सरकारमध्ये राज्याचे मंत्री झाले तरी मंत्री गडाख यांनी या घोटाळ्याची साधी चौकशीही केली नाही. याचाच अर्थ नेवाशाचे आजी माजी लोकप्रतिनिधी स्वत:च्या फायद्यासाठी सोयीचं राजकारण करत असल्याचे सांगून मुळा कारखान्याने ऊस उत्पादक शेतकर्यांची दिवाळी गोड करावी, अशी अपेक्षा शेटे पाटील यांनी व्यक्त केली.
Tags :
447
10