पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्याचे युवा नेते नानाभाऊ पडळकर मित्र मंडळाच्या वतीने भाजप चे मुख्य प्रवक्ते तथा एक धडाडीचे आमदार लोकनेते गोपीचंद पडळकर साहेब यांचा वाढदिवस पाथर्डी तालुक्यातील मोहरी रोड येथील मूकबधिर विद्यालय येथे शालेय साहित्य व जेवण देऊन साजरा करण्यात आला.पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी गावचे युवा नेते नानाभाऊ पडळकर यांच्या संकल्पनेतून मूकबधिर विद्यालय मोहरी रोड येथे आमदार पडळकर यांचा वाढदिवसानिमित्त येथील अनाथ आणि अपंग मूकबधिर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच त्या मुलांना वाढदिवसानिमित्त भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोरडगावचे उपसरपंच वसंत घुगरे पाटील ,तसेच शिवसंग्राम चे तालुकाध्यक्ष परमेश्वर टकले उपस्थित होते, या कार्यक्रमासाठी नानाभाऊ पडळकर मित्रमंडळाने परिश्रम घेतले ,तसेच या कार्यक्रमासाठी मूकबधिर विद्यालय येथील सर्व शिक्षक व सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी युवा नेते अजय खोर्दे ,योगेश लोखंडे ,संतोष दिंडे ,माऊली चोरमले, अंकुश सुसलारे, गोरक्ष हंडाळ, बालाजी नरोटे, बाळासाहेब ठोंबरे, एकनाथ खटके, अमोल हाके, आप्पा बोंद्रे,महादेव नरोटे, आदी उपस्थित होते.