दिगंबर गाडे मित्र मंडळाच्या वतीने आय.ए.एस. सुहास गाडे यांचा सत्कार
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्याचे सुपुत्र सुहास लक्ष्मण गाडे यांची भारतीय लोकसेवा आयोग परीक्षेतून पाथर्डी तालुक्यातील प्रथम आयएएस होण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल दिगंबर गाडे सर मित्र मंडळाच्या वतीने नुकताच त्यांचा पाथर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी सुहास गाडे म्हणाले, घरातूनच शिक्षणाचे बाळकडू मिळाल्याने आपल्याला येथपर्यंत झेप घेता आली. प्रत्येकाने संघर्ष करण्यापेक्षा शिक्षण घ्यावे. शेवगाव व पाथर्डी तालुके दुष्काळी असले, तरीही बुद्धिवंतांची येथे कमी नाही. माझ्या आजोबांनी वडिलांना शिकविले व माझ्या वडिलांनी मला शिकविल्याने आज मी यश मिळविले, असे मनोगत गाडे यांनी व्यक्त केले.
या सत्कार कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगरसेवक बंडू बोरुडे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन सुरेश मिसाळ, राजश्री शाहू महाराज पतसंस्थेचे चेअरमन दिगंबर गाडे, मागासवर्गीय ओबीसी अल्पसंख्यांक संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान आराख, प्राचार्य शरद मेढे, चाँद मनियार, जगदीश गाडे, बौद्धाचार्य वसंत बोर्डे, पप्पू बोर्डे, सुहास गाडे, सविता गाडे आदींची उपस्थिती होती.