पाथर्डी - पत्नीवर पतीसह मिञाकडून अत्याचार, धक्कादायक घटना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील घटना
तुला मूल होत नाही ते होण्यासाठी तु माझ्या मिञाशी शरीरसंबध ठेव असे सांगून पतीनेच पत्नीचा घात केला.पतीने गोळ्या दिल्या आणि मला चक्कर आली.त्यानंतर पती व त्याच्या मिञाने माझ्यावर बलात्कार केला.झालेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे ठार मारीन अशी धमकी दिली.दुसऱ्या दिवशी ही दोघांनी पुन्हा बलात्कार केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे घडली.पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन दोघांनाही गजाआड केले आहे.याबाबत अधिक माहीती अशी, पागोरी पिंपळगाव येथे कुटुंब राहते.पत्नीला मुल होत नसल्याने पतीने 22 सप्टेंबर 2021 रोजी त्याच्या एका मिञाला राञी दहा वाजता घारी आणले.घराची आतून कडी लावली.तुला मुल होण्यासाठी तु त्याच्यासोबत शरीर संबंध ठेव असे सांगितले.तेव्हा पत्नीने विरोध केला.त्यानंतर पतीने तीला दोन गोळ्या दिल्याने तिला चक्कर आली त्यानंतर संबंधित मिञाने तिच्यावर बलात्कार केला.नंतर पतीनेही बलात्कार केला.
दुसऱ्या दिवशी पुन्हा राञी दहा वाजता तो मिञ व पती घरी आले.व त्यांनी दोघांनीही पुन्हा बलात्कार केला.आत्याचारीत महीलेने पोलीसात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांना संबंधित मिञ व महीलेचा पती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे तपास करीत आहेत.
अत्याचारीत महीलेचे भाऊ पुणे येथून पाथर्डी पोलिस स्टेशन ठाण्यात येथे आले होते.भावांना पाहताच अत्याचारीत महीलेने टाहो फोडला.महीलेचे भाऊ ,आई व नातेवाईकांनी फोडलेला टाहो काळीज चिरुन टाकीत होता.यावेळी उपस्थित पोलिस बांधवही हळहळले.अत्याचारीत महीलेचे नातेवाईक तिला घेऊन पुणे येथे गेले आहे.