शिर्डी- साईबाबा मंदिर दहशतवाद्यांच्या रडारवर 'या' देशाचे कनेक्शन तिघे जेरबंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दोन वर्षांपूर्वी 14 फेब्रुवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा याठिकाणी आतंकवाद्यांनी मोठा घातपात घडवला होता. यामध्ये अनेक भारतीय सैनिक मृत्यूमुखी पडले होते. या घटनेनंतर बरोबर दोन वर्षांनी महाराष्ट्रातील शिर्डी येथील साईबाबा मंदिरात बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा बेत असल्याची खळबळजनक माहिती ATS च्या तपासात समोर आली आहे. गुजरात एटीएसने दुबईहून आलेल्या तीन जणांना अटक केली असून त्यांनी शिर्डीतील साईबाबा मंदिराची रेकी केल्याची कबुली दिली आहे.
पुलवामा घातपातानंतर बरोबर दोन वर्षांनी महाराष्ट्रातील शिर्डी येथील साईबाबा मंदिरात बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा बेत असल्याची खळबळजनक माहिती ATS च्या तपासात समोर आली आहे.
दहशतवाद्यांच्या कटाची माहिती समोर येताच शिर्डीत खळबळ उडाली असून शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला आणि मौलाना गनी उस्मानी असं अटक केलेल्या तीन दहशतवाद्यांची नावं असून ते दुबईतून भारतात आले होते. त्यांनी घातपात घडवण्यासाठी शिर्डी येथील साईबाबा मंदिराची रेकी केली होती. संबंधित सर्व दहशतवाद्यांचा संबंध पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेशी असल्याची माहिती गुजरात एटीएसने दिली आहे.