पोलिसावर आरोपींच्या नातेवाईकांचा हल्ला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
फसवणुकीच्या दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी गेलेल्या तोफखाना पोलिसांवर भेंडा (ता. नेवासे) येथे आरोपींच्या नातेवाईकांनी हल्ला केला. ही घटना आज सायंकाळी घडली. नेवासा पोलिस ठाण्यात आरोपीच्या चौघा नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी, तोफखाना ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात सागर धनवडे याला पोलिस अटक करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सागर हा घरासमोरच उभा होता. पोलिसांनी त्याला जागीच पकडले. परंतु त्याने आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी त्याच्या घरातून मच्छिंद्र धनवडे, सचिन ऊर्फ रुद्रा धनवडे, सोनाली कुसळकर व सुरेखा धनवडे बाहेर आले. त्यांनी आमच्या मुलाला सोडा, असेे म्हणत रागाने शिवीगाळ करत अंगावर धावून आले. लाकडी दांडक्यानेे मारहाण केली. महिलांनी देखील पोलिसांवर हल्ला केला. या दरम्यान सागर धनवडे पळून गेला. पोलिस कर्मचारी गौतम सातपुते यांनी फिर्याद दिली आहे.