महाराष्ट्र
अखेर काळ्या ओढ्यातील रस्त्यावर टाकण्यात आल्या सिमेंटच्या नळ्या
By Admin
अखेर काळ्या ओढ्यातील रस्त्यावर टाकण्यात आल्या सिमेंटच्या नळ्या
डॉ क्षितिज घुले युवा मंचाच्या कार्यकर्त्याकडून कामाची पहाणी.
शेवगाव (प्रतिनिधी)-
शेवगांव - गेवराई राज्यमार्गाच्या रहदारीतील आडसर म्हणून गेल्या एका वर्षापासुन शेवगांव तालुक्यातील बोधेगाव येथील काळ्या (फरशी ) ओढ्याचा प्रश्न वाहतुकदाराना सतावत होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी डॉ क्षितिज भैय्या घुले युवा मंचच्या वतीने ओढ्यातील रस्त्याच्या पाण्यात उतरण्यासाठी पाच दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला होता. सा बा विभागाने याची दखल घेत आज मंगळवार दि.१४ रोजी सिमेंट नळया टाकून काम पूर्ण केले.
प्रत्यक्ष पहाणी करत असताना डॉ क्षितिज घुले युवा मंचचे कार्यकर्ते अनिल घोरतळे, सचिन घोरतळे, सिद्धांत घोरतळे, चेतन देशमुख, संतोष पावसे, मोहित पारनेरे, सुमित दसपुते, अर्जुन दराडे यांनी सिमेंट नळ्या टाकत असताना पुलाची लांबी, रुंदी, उंची तसेच ओढा आणि रस्त्याची उंची या गोष्टी विचारात घेण्याच्या सूचना दिल्या. या काळ्या ( फरशी ) ओढ्यासाठी बोधेगाव मधुन अनेक संघटनानी सा बा विभागाला निवेदने दिले. परंतु मुरुम डबर टाकण्या व्यतिरिक्त सा बा वि ने यावर उन्हाळ्यात काहीही केले नाही. परंतु जसा पाऊस सुरु झाला तसा हा ओढा पुन्हा वाहु लागला आणि वाहतुकदाराना या समस्येला पुन्हा सामोरे जावे लागले. या ओढ्यातुन जात असताना खड्ड्यांचा आंदाज न आल्याने आनेकाना आपघाताला सामोरे जावे लागले. गेल्या वर्षी उसाची वाहतूक सुरु असताना अनेक उसाच्या बैल
गाड्यासह ट्रक तसेच ट्रॅक्टरचे टायर फुटुन अपघात झाले. रस्त्याच्या या डोकेदुखीपासुन केंव्हा सुटका मिळतेय या विचारानी सर्वसामान्य वाहतूकदार परेशान होता. राज्यमर्गाची वाहतूक पाणी आल्यानंतर तब्बल दहा ते बारा घंटे बंद राहात असताना देखिल मागिल वर्षी याचा विचार करण्यात आला नाही. परंतु डॉ क्षितिज भैय्या घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घुले युवा मंचच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदने देण्यात आली. या ओढ्यातील रस्त्याचा प्रश्न मर्गी लावण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागला तरी मागे न हटण्याचे धोरान घुले युवा मंचच्या कार्यकर्त्यानी ठेवले असताना सा बा विभागाने दिलेल्या निवेदनावर तात्पुरत्या स्वरूपात गेल्या आठवडाभरा पुर्वी ओढ्यातील रस्त्याची उंची वाढविण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाला त्यानंतर सिमेंट नळ्या टाकण्यासाठी घुले युवा मंचच्या कार्यकर्त्याकडुन पुन्हा ओढ्यातील पण्यात उतरण्यासाठी पाच दिवसाचा अक्टीमेटम सा बा विभागाला देण्यात आला. यानंतर मात्र सा बा विभागाने याची गंभीर दखल घेत आज या काळ्या ( फरशी) ओढ्यातील रस्त्यावर ८ फुटाचे तीन टप्पे करत सिमेंटच्या नउ नळ्या शेवगांव सा बा विभागाचे उपविभागीय अभियंता अंकुश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकण्यात आल्या. यावेळी सा बा विभागाने रहदारीचा विचार करत डबर, मुरुम, जे सि बी, क्रेन, आदींची आधीच सोय केल्याने सदरील काम फक्त सहा घंट्यात पुर्ण करण्यात आले. यावेळी सा बा विभागाचे आनंद सोलट सह कर्मचारी यावेळी हजर होते. यावेळी दक्षिण भारतातुन येणारी सर्व वहातूक अंतरवाली मार्गे तर उत्तरेकडुन येणारी वाहतूक हातगाव मार्गे वळविण्यात आली होती.वाहतूक सुरळित करण्यासाठी बोधेगाव बिटचे साहाय्यक पोलिस उपनिरिक्षक भगवान बडधे यांच्या मार्गदर्शनाखाली होमगार्ड लक्ष्मण धोत्रे, विशाल ढाकने यानी बंदोबस्त ठेवला.
Tags :
1939
10