राज्यमंञी प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली महावितरण विषयी भिती, असेही होऊ शकते
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
केंद्राकडून वीज वितरणाच्या खाजगीकरणाची चर्चा दबक्या आवाजात सुरू असल्याचे ऐकतोय, असे झाले तर जुलमी वसुली सुरू होईल, अशी भीती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज व्यक्त केली. केंद्राच्या खाजगीकरणाच्या धाेरणामुळे आधीच अडचणीत असलेला राज्यातील शेतकरी अधिक मोडीत निघेल, असेही त्यांनी म्हटले. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामीण भागातील विजेच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना वीज वितरणाच्या संभाव्य खाजगीकरणावर आपले मत व्यक्त केले.
राज्यमंत्री तनपुरे यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या धाेरणावर जाेरदार टीक केली. याशिवाय भाजपने अहमदनगरमध्ये केलेल्या आंदाेलनाला स्टंटबाजी असल्याचे म्हणून खिल्ली उडवली. भाजपचे खासदार डाॅ. सुजय विखे यांच्यावरही यावेळी जाेरदार टीका केली. ते म्हणाले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना ते ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते आहेत, याचे भान ठेवले पाहिजे. भाजपमध्ये गेलेल्यांना शांत झोप लागते आहे. त्यामुळे त्यांना अशी खुमखुमी वाटत आहे. मात्र आम्हीही तुमचे बॅलन्स शीट चेक करू शकताे, असेही ते म्हणाले.
नगर तालुक्यात अनेक वर्षे वीज वितरणाचे पायाभूत प्रश्न रखडले गेल्याने अडचणी आहेत. मात्र आता मी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी पण आहे. त्यामुळे अभ्यासपूर्ण माहिती घेऊन वीज उपकेंद्र, फिडर, राेहित्र या सर्व पातळ्यांवर कामांचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नगर तालुक्यातील सर्व विजेचे प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना मदत केली जाईल, अशी ग्वाही तनपुरे यांनी दिली.