पाथर्डी येथील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत टाऊन किंग संघ विजेता
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या मैदानावर गेली १५ दिवसांपासून सुरू असलेल्या मा.आ. स्व. बाबुजी आव्हाड करंडक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद टाऊन किंग संघाने पटकावले.
अंतिम फेरीच्या सामन्याची नाणेफेक मा. नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आली. टाऊन किंग आणि राजेंद्र कन्स्ट्रक्शन या दोन अव्वल संघात अंतिम फेरीचा सामना होऊन त्यामध्ये अभय आव्हाड यांनी पुरस्कृत केलेले रु ३१ हजाराचे पारितोषिक व विजेतेपद टाऊन किंग संघाने पटकावले.
बंडूशेठ भांडकर यांनी पुरस्कृत केलेले रु २१ हजाराचे द्वितीय पारितोषिक व उपविजेतेपद राजेंद्र कन्स्ट्रक्शन संघाला मिळाले. तसेच अजिनाथ डोमकावळे पुरस्कृत रु. ११ हजाराचे पारितोषिक गुलशन स्टार संघाला मिळाले.
पारितोषिक व करंडक वितरण नगरसेवक प्रसाद आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे, आजिनाथ डोमकावळे, ॲड. प्रतिक खेडकर, फारुखभाई शेख, राजेंद्र शिरसाट आदी उपस्थित होते.